आपल्या बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (hemangi kavi). नाटक, मालिका आणि सिनेमा यांच्या माध्यमातून तिने कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीपासून सुरु झालेला तिचा प्रवास आता हिंदी सिनेसृष्टीपर्यंत पोहोचला आहे. अलिकडेच ती सुश्मिता सेन (sushmita sen) हिच्या 'ताली (taali) या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजच्या निमित्ताने हेमांगीला सुश्मितासोबत काम करायची संधी मिळाली. त्यामुळे सुश्मिताच्या वाढदिवसानिमित्त हेमांगीने एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे हेमांगीची पोस्ट?
"तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. १९९४ मध्ये ज्यावेळी तू मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकलास, तेव्हा सुद्धा ही गोष्ट केवळ आपल्या देशासाठी अभिमानाची नव्हती, तर देशातील प्रत्येक मुलीसाठी ती खूप मोठी गोष्ट होती. हा प्रत्येक मुलीचा वैयक्तिक विजय होता. ही पदवी जणू त्या प्रत्येकीची होती. ", असं हेमांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "तुझ्यासोबत ती प्रत्येक मुलगी जिंकली होती जिला तिच्या सावळ्या रंगामुळे, उंचीमुळे समाजाकडून किंवा काही वेळा तिच्याच जवळच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागले होते. पण, तू माझ्यासारख्या अनेक मुलींना प्रोत्साहन दिलं, त्यांना धीर दिला, स्वप्न पूर्ण करण्याचं बळ दिलं. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक सावळी, सर्वसामान्य विचारांची मुलगी असाधारण विजय मिळवू शकते. आपल्या विचारांनी, विजयाने लोकांना प्रेरणा देऊ शकते. स्वत:च्या अटींवर जीवन जगू शकते, ती आनंदाने राहू शकते हे दाखवून दिलं.सोबत असण्यासाठी खूप धन्यवाद सुश!"
दरम्यान, हेमांगीने ताली या वेबसीरिजमध्येसुश्मिता सेनसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सीरिजमध्ये हेमांगीने सुश्मिताच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.