Join us  

वेबसीरिज चांगली तरीही कायद्याच्या कचाट्यात का अडकली? 'IC 814 कंदहार हायजॅक'ला 'ती' चूक भोवली?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 6:00 PM

'IC 814 कंदहार हायजॅक' वेबसीरिजबद्दल सध्या मोठा वादंग निर्माण झाला. काय आहे नेमका वाद? वाचा एका क्लिकवर (IC 814 Kandahar Hijack)

'IC 814 कंदहार हायजॅक' वेबसीरिजची सध्या चांगली चर्चा आहे. या वेबसीरिजमध्ये विजय वर्मा, दिया मिर्झा, अमृता पुरी, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने ही वेबसीरिज सजली आहे. अनुभव सिन्हा यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलंय. वेबसीरिजचा कंटेंट, दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. पण या वेबसीरिजच्या मेकर्सची एक चूक सध्या त्यांना चांगलीच महागात पडलेली दिसतेय. इतकंच नव्हे तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडला समन्स बजावलंय. काय आहे हा नेमका वाद?

'IC 814' वेबसीरिज का अडकली वादाच्या भोवऱ्यात?

'IC 814 कंदहार हायजॅक' वेबसीरिज एक उत्तम कलाकृती असूनही एका मुद्द्यामुळे ही सीरिज सध्या वादात अडकली आहे.  वेबसीरिजमध्ये या विमानाचं अपहरण केलेल्या दहशतवाद्यांची नावं शाहिद अख्तर सईद, इब्राहिम अतहर, सनी अहमद काजी,  गुलशन इकबाल, मिस्त्री जहूर इब्राहिम आणि शाकिर अशी असतात. परंतु पुढे हीच माणसं विमानात वावरताना एकमेकांना भोला, शंकर, चीफ, डॉक्टर, बर्गर या नावाने संबोधतात. सोशल मीडियावर लोकांनी भोला आणि शंकर या दोन नावांवर आक्षेप घेतला आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जाणूनबुजून हिंदू नावांचा वापर केल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस

या मुद्द्यावर बोट ठेऊन केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या हेडला समन्स बजावलं आहे. हिंदू नावं का ठेवली, या प्रश्नाचं उत्तर देण्याची मागणी नेटफ्लिक्सकडून होत आहे. याशिवाय ही घटना घडल्यानंतर जानेवारी २००० मध्ये विदेश मंत्रालयाने दिलेल्या रिपोर्टनुसार, अपरहणकर्त्यांनी ज्या कोड वर्ड्स नावांचा वापर केलेला तीच नावं सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर काही जणांनी सीरिजची बाजूही घेतली आहे. आता या वादाला पुढे कोणतं स्वरुप मिळणार, यामुळे वेबसीरिजवर कसा परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :दीया मिर्झानसिरुद्दीन शाहपंकज कपूर