Join us

सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:14 IST

आता 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत.

सध्या राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवार सत्तेत सहभागी झाले. हे एकंदरच गरमागरमीचे वातावरण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’(Mi Punha Yein)ची आठवण करून देत आहे.  

साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या बेवसीरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यातील डायलॅाग्जही भरपूर गाजले होते. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण. 

अनेक मीम्स होतायेत व्हायरलसध्याच्या स्थितीवर आधारित जोक्स, मीम्स सर्वत्र झळकत असतानाच या सीरिजमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मीम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सीरिज पाहाण्याची उत्सुकता लागली आहे. ही वेबसीरिज सध्य स्थितीशी कशी साधर्म्य साधणारी आहे, यातील प्रत्येक कलाकार आपल्याला कोणाची ओळख करून देतो याबद्दलचे अनेक मिम्स सध्या सर्वत्र शेअर होत आहेत. परिणामी, तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, रूचिता जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :सयाजी शिंदेमकरंद अनासपुरे