Join us  

Exclusive: "सीन झाल्यावर आधी व्हॅनिटीमध्ये येऊन..."; 'धुरळा'मध्ये इंटिमेट सीन दिल्यानंतर ज्ञानदाच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय?

By देवेंद्र जाधव | Published: July 20, 2024 3:14 PM

धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत इंटिमेट सीन दिल्यावर ज्ञानदा घरच्यांना काय म्हणाली. तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधलाय (dnyanada ramtirthkar)

ठिपक्यांची रांगोळी फेम मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर चर्चेत असते. ज्ञानदाची पहिली हिंदी वेबसीरिज कमांडर करण सक्सेना रिलीज झालीय. त्यानिमित्ताने लोकमत फिल्मीशी बोलताना ज्ञानदाने अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. ज्ञानदाने धुरळा सिनेमात अमेय वाघसोबत एक इंटिमेट सीन केला होता. त्यावेळी तिच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, याविषयी ज्ञानदाने दिलखुलास संवाद साधलाय. 

ज्ञानदा मुलाखतीत म्हणाली,  "तो सीन करणं हे आमचं स्क्रिप्टमध्ये ठरलं नव्हतं. जेव्हा आमची रिहर्सल झाली तेव्हा हे ठरलं. आमच्या टीमने पहिला माझा comfort लक्षात घेतला. अमेय सुद्धा हेच म्हणाला की, मला विचारण्यापेक्षा तिला विचारा. तिचा comfort महत्वाचा आहे. समीर विद्वांस सरांनी सुद्धा मला दोन तीन वेळा विचारलं करू शकशील का? त्या स्क्रिप्टची गरज असेल तर करायला हरकत नाही असं वाटतं. तो सीन शूट झाल्यावर सगळ्यात आली vanity मध्ये जाऊन मी घरी फोन करून सांगितलं. घरच्यांनी सुद्धा सर्व sportingly घेतलं. थेट सीन बघताना अरे बापरे होण्याआधी मी त्यांना आधीच सांगितलं. त्या बाबतीत मला आई वडिलांचा सपोर्ट आहे."

ज्ञानदा पुढे म्हणाली,  "मी एक वेबसिरीज केली होती. त्यात अशी गरज होती होती की त्या कॅरॅक्टरला धूम्रपान करायचं होतं. मी कधी माझ्या आयुष्यात स्मोक केलं नाहीय. त्यामुळे मी विचारात पडले. तेव्हा बाबा म्हणाले, बाकी सगळं चांगलं असेल आणि तुला करायचं असेल तर मी एक बॉक्स घेऊन येतो. स्मोकिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर घरी करून बघ. तुला ओके वाटतंय का! comfortable वाटतंय का हे बघ! आपल्यालाही माहीत पाहिजे की, कोणत्याही गोष्टीत वाहवत जाणं चुकीचं आहे. दुर्दैवाने तो प्रोजेक्ट पुढे झाला नाही."

ज्ञानदा शेवटी म्हणाली, "मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून आलो आहोत त्यामुळे आपण त्यांच्या विचारांची प्रोसेस कंट्रोल नाही करू शकत. पण असं काही करायचं असेल तर त्याची माझ्या घरच्यांना कल्पना असू शकते. धुरळाच्या वेळीही दिग्दर्शक, कलाकार यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आम्ही गावात शूट करत असल्याने गर्दी व्हायची आजूबाजूला. त्यामुळे तो सीन शूट करताना आमच्या क्रू शिवाय कोणीही येणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सिनेमाच्या टीमचंही कौतुक आहे."

टॅग्स :वेबसीरिजमराठीमराठी अभिनेताधुरळाअमेय वाघ