Join us

Mirzapur 3 : 'गुड्डु पंडित आणि गोलुची खास पोस्ट', मिर्झापुर ३ चे शुटिंग संपले; चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:06 IST

मिर्झापुर वेब सिरीजच्या दोन्ही सिझनने अक्षरश: धुमाकुळ घातला. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिसऱ्या सिझनची.

पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगावकर, दिव्येंदु अशी तगडी स्टारकास्ट असलेली वेब सिरीज मिर्झापुरचे चाहते काही कमी नाहीत. या सिरीजच्या दोन्ही सिझनने अक्षरश: धुमाकुळ घातला. आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती तिसऱ्या सिझनची. (Mirzapur Web Series) 

मिर्झापुरच्या चाहत्यांसाठी अली फजल म्हणजेच तुमच्या गुड्डु पंडितने खुशखबर दिली आहे. फोटो शेअर करत त्याने मिर्झापुर ३ चे शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता आणखी उत्सुकता लागली आहे.

यामध्ये अली फजल आणि श्वेता त्रिपाठी दिसत आहेत. सोबतच इतर टीम मेंबर्स आहेत. अली फजलने टीम चे आभार मानले आहेत. तर श्वेता त्रिपाठीने चाहत्यांसाठी खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे गोलु गुप्ताची व्हॅनिटी व्हॅन दिसत आहे आणि तिचे शुटिंग पूर्ण झाल्यनिमित्त तिने केक कट केला आहे.

मिर्झापुर ३ पुढील वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.मिर्झापुर २ नंतर कहाणी कशी पुढे जाते हे बघण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजअली फजलश्वेता त्रिपाठीश्रिया पिळगावकरपंकज त्रिपाठी