तरुणाईची आवडती सीरिज 'मिसमॅच्ड' चा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. हाही सीझन एकदम सुपरहिट आहे. प्राजक्ता कोळी, रोहित सराफ, अहसास चन्ना, तारुक रैन यांच्या लव्हस्टोरी या सीझनमध्ये विशेष आकर्षण आहे. प्राजक्ता-रोहित डिंपल आणि रिषीच्या भूमिकेत आहेत. त्यांना पहिल्या सीझनपासूनच खूप प्रेम मिळालं. मात्र आता तिसऱ्या सीझनमध्ये अहसास चन्ना (Ahsaas Channa) आणि तारुक रैनाच्या (Taaruk Raina) लव्हस्टोरीने तरुणाईचं मन जिंकलं आहे. विशेष म्हणजे दोघंही खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
चर्चांवर अहसास चन्नाने सोडलं मौन
'पिंकव्हिला'शी बातचीत करताना अहसास चन्नाने लिंकअप्सवर मौन सोडलं. ती म्हणाली, "मी माझ्या चाहत्यांना आणि जे असा विचार करताएत की आम्ही डेट करतोय त्यांना सांगू इच्छिते की प्लीज आमचं नाव असंच जोडत राहा. असं नक्कीच होऊ शकतं कारण आम्ही दोघंही सिंगल आहोत आणि एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे काही सांगता येत नाही."
अहसासने चाहत्यांना असं उत्तर देऊन संभ्रमात टाकलं आहे. दोघांची केमिस्ट्री सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. मुलाखतींमधील त्यांचे काही व्हिडिओ एडिट करुन सोशल मीडियावर गाजत आहे. सीरिजमध्ये दोघांचे किसींग सीन्सही आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.
अहसास चन्ना ओटीटीवर चांगलीच लोकप्रिय आहे. 'कोटा फॅक्टरी','हाफ सीए' या सीरिजही तिने गाजवल्या आहेत. आता 'मिसमॅच्ड'सीरिजमध्येही ती महत्वाच्या भूमिकेत आहे.