Join us

पहिल्या घटस्फोटावर नीलम कोठारीने पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाली, "त्याने मला माझी ओळख..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 09:04 IST

पहिल्यांदा लेकीला घटस्फोटाबद्दल कसं कळालं? म्हणाली, "तिने गुगलवर..."

८० ते ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari). गोविंदा, बॉबी यांच्यासोबत तिची जोडी चांगलीच गाजली. नीलमने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. मात्र नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. नीलमने 2000 साली ऋषि सेठियासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ती परदेशात स्थायिक झाली. मात्र त्यांचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नावर नीलमने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी ती खूप भावुकही झाली.

नेटफ्लिक्सवरील 'फॅब्युलस लाईफ्ज व्हर्सेस बॉलिवूड वाईव्ह्ज' या शोचा नवीन सीजन नुकताच आला आहे. यातील एका एपिसोडमध्ये नीलमने पहिल्या घटस्फोटावर भाष्य केलं. नीलमच्या लेकीला आईच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल कसं कळालं याचा खुलासा तिने नुकताच केला. नीलम म्हणाली, "मी एकदा कामावरुन घरी आले आणि आहाना तिच्या मैत्रिणींसोबत होती. इतर वेळी या मुली नेहमी खेळत असता, मस्ती करत असतात. पण यावेळी त्यांच्यात एकदम शांतता होती. आहाना माझ्याजवळ आली आणि म्हणाली, 'आई, तू कधी सांगितलं नाहीस की तुझा घटस्फोट झाला आहे?'. तिचा प्रश्न ऐकून मी स्तब्ध झाले. माझ्याकडे शब्दच नव्हते. मी विचारलं, 'तुला कसं समजलं?' ती म्हणाली, 'तू सेलिब्रिटी आहेस, तर आम्ही तुझ्याबद्दल गुगलवर सर्च केलं. त्यावर तुझ्या घटस्फोटाचं दिसलं. तुझं लग्न झालं होतं."

पहिल्या लग्नाबद्दल बोलताना नीलम भावुक होत म्हणाली, "मला तो भारतीय कपडेच घालायला लावायचा. नॉनव्हेज आणि अल्कोहोलचीही परवानगी नव्हती. तरी हे सगळं ठीक होतं. पण त्याने मला नंतर माझं नाव बदलायला सांगितलं. मी तेही मान्य केलं. पण जेव्हा त्याने मला माझी ओळखच लपवायला सांगितली तेव्हा मात्र मी नकार दिला. हे सगळं मी कसं काय होऊ देत आहे असा मलाच प्रश्न पडला. बरेचदा सुपरमार्केटमध्ये गेल्यावर लोक मला विचारायचे, 'तू नीलम ती अभिनेत्रीच ना?' आणि मला त्यांना नाही मी नीलम नाही असं सांगायचे."

नीलमने नंतर काही वर्षांनी २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली. २०१३ मध्ये त्यांनी आहानाला दत्तक घेतलं. नीलम ज्वेलरी डिझायनर आहे. तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँडही आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीघटस्फोट