Join us

Pakistan Web Series : पाकिस्तानी वेबसिरीजमध्ये 'हिंदूंविरोधात प्रचार', भारतीय नागरिकांचा ट्विटरवर गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 8:48 AM

सिरीजमध्ये पूर्णपणे हिंदूंच्या विरोधात प्रचार करण्यात आला आहे. या सिरीजमधून हिंदूची प्रतिमा मलीन केली जात आहे असे आरोप केले जात आहेत

भारत आणि पाकिस्तानचं नातं जगजाहिर आहे. मग ते खेळ असो किंवा एखादी सिनेमा दोन्हीमध्ये ते दिसून येतं. दोन्ही देशातील कटुता चर्चेचा विषय असते. नुकतेच पाकिस्तानच्या एका वेबसिरीज ने भारतात खळबळ माजली आहे. 'सेवक - द कन्फेशन' या वेब सिरीजमुळे ट्विटरवर चांगलाच हंगामा सुरु आहे.(Pakistani Web Series)

'सेवक द कन्फेशन' ही पाकिस्तानी वेब सिरीज २६ नोव्हेंबर ला रिलीज झाली. याचे एपिसोड्स युट्युबरवर उपलब्ध आहेत. या सिरीजमुळे भारतीय नागरिक चांगलेच संतापले आहेत. ते स्वाभाविकही आहे कारण सिरीजमध्ये पूर्णपणे हिंदूंच्या विरोधात प्रचार करण्यात आला आहे. या सिरीजमधून हिंदूची प्रतिमा मलीन केली जात आहे असे आरोप केले जात आहेत. सध्या ट्विटरवर या सिरीजवरुन चांगलाच गदारोळ झाला आहे.

सेवक द कन्फेशन ची कहाणी १९८४ च्या दंगलीची आहे. गुजरात दंगल आणि बाबरी मस्जिद वादावर ती आधारित आहे. ट्रेलर मध्ये संत हिंदूंना गुन्हेगार दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर सिरीजमध्ये दीप सिद्धू, हेमंत करकरे,गौरी लंकेश आणि जुनैद खान यांच्या आयुष्याचीही झलक दिसते. एकंदर सिरीजमध्ये हिंदूविरोधी प्रचार दिसून येतोय. हे बघून भारतीय नागरिक भडकले आहेत.

काही युझर्सने सिरीजवर टीका केली आहे तक काहींनी म्हणले आहे की आम्हाला तर कहाणीच कळाली नाही. काहींना सिरीज विनोदी वाटली. जर असा प्रचार करायचा अशेल तर आधी अभिनय करायला शिका अशी टीका युझर्सने केली आहे.

Ranbir Kapoor : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा

भारतात सिरीजवर विरोध दिसून येत आहे. मात्र शो च्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतेच स्टेटमेंट आलेले नाही. अंजुम शहजाद यांनी सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. 

टॅग्स :पाकिस्तानहिंदूट्विटर