सोशल मीडियावर सध्या 'पंचायत 2' फेम भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. बिहारजवळील एका गावानजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये आंचलचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या अपघातात आंचला मृत्य़ू झाला नसून ती सुखरुप आहे. याविषयी स्वत: आंचलने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
आंचलच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. परिणामी, चाहत्यांवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली होती. मात्र, मला काहीही झालं नाही. मी जिवंत आहे, असं म्हणत आंचलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे.
रविवारी बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील देवकली गावाजवळ एक गंभीर अपघात झाला होता. एकाच वेळी ट्रक, एसयुव्ही कार आणि मोटरसायकल यांची धडक झाली. या अपघातामध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी हिचा मृत्यु झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मी सुखरुप आहे, असं आंचलने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील देवकली गावाजवळ एक भीषण अपघात झाला. यात एका गाडीत दोन महिलांसह ८ जण बसले होते. यावेळी या गाडीने एका मोटरसाकलला धडक दिली. त्यानंतर दुसऱ्या एका लेनमधून एसयुव्ही आणि एक बाईक जात होती. या दोघांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यावेळी अपघात झालेल्या एका कारमध्ये आंचल असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर हा अपघात इतका गंभीर स्वरुपाचा होती की त्यात आंचलचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याचंही म्हटलं जात होतं.