Join us

Panchayat 3: सचिवजी सोडणार का फुलेरा गाव?, 'पंचायत ३'चा फर्स्ट लूक आउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:10 IST

Panchayat 3 : लोकप्रिय वेबसीरिज पंचायतच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे.

'पंचायत' (Panchayat) या वेब सीरिजच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. पंचायतीच्या दोन्ही सीझनमध्ये जितेंद्र कुमार(Jitendra Kumar)ने सेक्रेटरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. शोमधील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. अशा परिस्थितीत या सर्वाधिक लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी अखेर या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

प्राइम व्हिडिओने मोस्ट अवेटेड शोच्या तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. पंचायत सीझन ३चा फर्स्ट लुक रिलीज करताना प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर कॅप्शनमध्ये लिहिले की, "आम्हाला माहित आहे की प्रतीक्षा असह्य आहे, म्हणून आम्ही सेटवरून तुमच्यासाठी काहीतरी आणले आहे! प्राइमवर पंचायत सीझन ३."

पहिल्या फोटोत, सीरिजमध्ये सचिवाची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमार त्याच्या आयकॉनिक बाईकवर स्वार होताना दिसत आहे. पाठीवर बॅग घेऊन आणि चष्मा घातलेला तो पूर्ण स्वॅगमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, अशोक पाठक (बिनोद) आणि त्याचे सीझन २चे सह-कलाकार दुर्गेश कुमार आणि बुल्लू कुमार यांची झलक पाहायला मिळत आहे. तिघेही एका बाकावर बसलेले दिसतात. 

नीना गुप्ता यांनी केलं शूटिंग पूर्ण'पंचायत'मध्ये मंजू देवीची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांनी तिसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यांनी सेटवरून एक रॅप-अप व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात शोच्या कलाकार आणि क्रूसह केक कटिंग समारंभाचा समावेश होता. रघुबीर यादव (ब्रिजभूषण दुबे), चंदन रॉय (विकास), सान्विका (रिंकी), फैसल मलिक (प्रल्हाद पांडे) हे देखील व्हिडिओमध्ये दिसत होते. ते शेअर करताना नीना गुप्ता यांनी लिहिले, “पंचायतीच्या तिसऱ्या सीझनचा शेवट!”

'पंचायत'चे दोन्ही सीझन ठरले हिटपंचायतचे दोन्ही सीझन खूप हिट झाले होते. पहिला सीझन २०२० मध्ये आला होता. यानंतर त्याचा दुसरा सीझन २०२२ मध्ये रिलीज झाला, जो चाहत्यांना खूप आवडला होता. सध्या चाहत्यांना पंचायत मालिकेच्या तिसर्‍या सीझनचीही प्रचंड उत्सुकता आहे. पंचायत सीझन ३ पुढील वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.