सध्या सगळीकडेच वेडींग सीझन सुरू आहे. कलाविश्वातही अनेक सेलिब्रिटींच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर काही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. 'पंचायत' फेम अभिनेताही लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
'पंचायत'सीरिजमध्ये जावयाच्या भूमिकेत असलेला अभिनेता आसिफ खान लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकतंच त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो समोर आले आहे. हळदीसाठी आसिफ आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीने पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं. त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला अभिनेत्री हुमा कुरेशीने भाऊ साकीब सलीमसोबत हजेरी लावली होती. साकीब सलीमने आसिफ खानच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी आसिफला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंचायत ही गाजलेली वेब सीरिज आहे. २०२० मध्ये या वेब सीरिजचा पहिला सीझन आला होता. यामध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, अशोक पाठक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजचे आत्तापर्यंत ३ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याच सीरिजमधून आसिफ खानला प्रसिद्धी मिळाली.