Join us

प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफच्या 'मिसमॅच ३' रिलीज डेट समोर, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:49 IST

'मिसमॅच ३' ( Mismatched 3) ची रीलिज डेटही समोर आली आहे.

Mismatched 3: युट्यूबर म्हणून नावारुपाला आल्यावर प्राजक्ता कोळीनं आपल्या सहज अभिनयानं प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरली. 'मिसमॅच' ही सीरिज आणि 'जुग जुग जियो' या बॉलिवूड चित्रपटातील तिच्या कामाचंही कौतुक झालं. तिच्या 'मिसमॅच'  या सीरिजच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. आता या सीरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मिसमॅच ३' ( Mismatched 3) ची रिलीज डेटही समोर आली आहे.

प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांची प्रमुख भुमिका असलेली  'मिसमॅच' सीरीजचा तिसरा सीझन हा येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.  रोहित आणि प्राजक्ताने साकारलेले ऋषी आणि डिम्पल पुन्हा प्रेक्षकांना खुणावणार आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल. नेटफ्लिक्सवर एक व्हिडीओ शेअर करत ही घोषणा करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि प्राजक्तानं त्यांच्या पहिल्या भेटीचा मजेशीर किस्सा आणि 'मिसमॅच ३'ची रीलिज डेटही सांगितली. 

प्राजक्ता आणि रोहित यांच्या व्यतिरिक्त या शोमध्ये मुस्कान जाफरी, रणविजय सिंघा, तारुक रैना, विद्या मालवदे, अभिनव शर्मा आणि कृतिका भारद्वाज या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर, हा नवा सीझन आणखी रंजक असणार आहे.  आकर्ष खुराणा आणि निपुण धर्माधिकारी यांनी 'मिसमॅच ३'चं दिग्दर्शन केलं आहे.  'मिसमॅच ३'मध्ये प्रेम, मैत्री आणि स्वत्वाचा शोध घेणारं कथानक पाहायला मिळेल.

टॅग्स :वेबसीरिजनेटफ्लिक्ससेलिब्रिटी