Join us

'सिटाडेल : हनी बनी'नंतर सामंथा 'या' नेटफ्लिक्स सीरिजमध्ये दिसणार, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:28 IST

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

समांथा रुथ प्रभू (Samantha Rurh Prabhu) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांत काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. लवकरच समंथा रुथ प्रभू ही वरुण धवन (Varun Dhawan) सोबत  आगामी 'सिटाडेल : हनी बनी' मध्ये दिसणार आहेत.  'सिटाडेल : हनी बनी'च्या ट्रेलरमधील दोघांच्या ॲक्शन सीक्वेन्सने लक्ष वेधून घेतलंय. अशातच आता समांथाविषयी आणखी एक अपडेट समोर आलं आहे. 

समांथा लवकरच नेटफ्लिक्सच्या आणखी एका सीरिजमध्ये दिसणार आहे. राज आणि डीके दिग्दर्शित 'रक्त ब्रह्मांड'मध्ये पाहायला मिळणार आहे. ही सीरीज  राजकारणावर केंद्रित आहे. यात सामंथाशिवाय आदित्य रॉय कपूर आणि अली फजल मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 'रक्त ब्रह्मांड' सीरिजचे 6 एपिसोड असणार आहेत. सीरिजची स्टोरी नेमकी काय असेल याकडे आता चाहत्यांचं लक्ष आहे.

समांथाची सिटाडेल : हनी बनी' ही ॲक्शन थ्रिलर वेब सिरीज आहे. 7 नोव्हेंबर रोजी 'सिटाडेल'चा प्राईम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. अमेरिकी सीरिज 'सिटाडेल'चं हे भारतीय व्हर्जन आहे. वरुण धवन, समंथा रुथ प्रभू, के के मेनन, साकिब सलीम, सिकंदर खेर, शिवांकित परिहार यांची सिनेमा मुख्य भूमिका आहे. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीनेटफ्लिक्स