Join us

सिंगल मदर...ते काय असतं? संजीदा शेखने मांडलं रोखठोक मत, म्हणाली, "माझी जबाबदारी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:56 IST

संजीदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिचा अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट झाला.

अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) 'हीरामंडी' या संजय लीला भन्साळींच्या वेब सीरिजमध्ये दिसली. तिला यामधून ओटीटीवर मोठा ब्रेक मिळाला. संजिदाने सीरिजमध्ये वहीदा ही भूमिका साकारली होती. तिने ही आव्हानात्मक भूमिका चांगल्या रितीने पेलली. संजीदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी तिचा अभिनेता आमिर अलीसोबत घटस्फोट झाला. त्यांना आयरा ही मुलगीही आहे. संजीदाकडेच लेकीची कस्टडी आहे. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत संजीदाने 'सिंगल मदर' या संकल्पनेवरच नाराजी व्यक्त केली. 

'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत संजीदा शेख म्हणाली, "सिंगल मदर म्हणजे काय असतं? मी आई आहे. आई ही आईच असते. मग सिंगल मदर असो किंवा नसो काही फरक पडत नाही.  माझी जबाबदारी काही कमी किंवा जास्त होणार नाहीए. एक आई म्हणून जे करायचंय आहे ते करायचंच आहे. आपल्या बाळाला पाहून जे बळ येतं ते जगात कुठूनही मिळणार नाही. मी खूप नशिबवान आहे. कारण माझ्या आयुष्यात तेव्हा जे काय घडलं तेव्हा मला भलेही असं वाटलं असेल की मी सर्वात जास्त निराश व्यक्ती आहे किंवा माझ्यासोबत हे काय घडतंय पण त्यातून बाहेर पडणं, तसा विचार करणं आणि आता मी जशी आहे त्यात खूश असणं हा एक आशीर्वादच  आहे."

आमिर अली आणि संजीदा शेख यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. 'क्या दिल मे है' मालिकेच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले. लग्नानंतर ६ वर्षांनी २०१८ साली सरोगसीच्या माध्यमातून दोघं आईवडील झाले. आयरा ही त्यांची मुलगी. २०२० साली आमिर आणि संजीदा वेगळे होत असल्याची माहिती समोर आली. २०२१ साली त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.

टॅग्स :संजीदा शेखटिव्ही कलाकारघटस्फोट