Join us

'सपने वर्सेस एव्हरीवन' मालिकेचा जगातील सर्वाधिक लोकप्रिय २५० मालिकांच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:08 IST

पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी आणि पिचर्स या मालिकांनंतर, आता ‘सपने वर्सेस एव्हरीवन’ ही मालिका, जागतिक स्तरावरील ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टेलिव्हिजनवरील मालिकांच्या यादीत समाविष्ट होणारी सातवी ‘टीव्हीएफ’ मालिका ठरली आहे.

'द व्हायरल फीव्हर' अर्थात ‘टीव्हीएफ’ हे त्यांच्या मालिकांमुळे सर्वपरिचित नाव बनले आहे.  ते युवा पिढीला महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर बेतणारी मालिका बनवणारे निर्माते आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यात प्रभुत्व संपादन केले आहे. हेच कारण आहे की, ‘टीव्हीएफ’च्या जास्तीत जास्त मालिकांना सर्वोच्च ‘आयएमडीबी’ रेटिंग प्राप्त होऊन ते सर्वांच्या पुढे आहेत. आणखी एक लक्षणीय मैलाचा दगड जोडत, ‘टीव्हीएफ’चा 'सपने वर्सेस एव्हरीवन' ही जागतिक स्तरावर ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांच्या यादीत स्थान पटकावणारी सातवी ‘टीव्हीएस’ मालिका बनली आहे. जागतिक स्तरावर विषयसामग्री क्षेत्रात ‘टीव्हीएफ’ने प्राप्त केलेल्या वर्चस्वाची ही जणू साक्ष आहे.

सर्वात लोकप्रिय २५० मालिकांच्या यादीत ‘टीव्हीएफ’च्या जास्तीत जास्त मालिकांचा समावेश झालेला आहे. म्हणजे, टीव्हीएफ’ची ‘अॅस्पिरंट’ ही मालिका- १११ व्या स्थानी वर, त्यांचीच ‘पिचर’ मालिका- ५४ व्या स्थानी, ‘कोटा फॅक्टरी’- ८० व्या स्थानी, ‘गुल्लक’- ८६ व्या स्थानी, ‘ये मेरी फॅमिली’- १४६ व्या स्थानी, ‘पंचायत’- ८८ वर, आता, ‘सपने वर्सेस एव्हरीवन’- या मालिकेनेही स्थान प्राप्त केले आहे. हे सर्व शो ‘टीव्हीएफ हाऊसचे’ असून त्यांना सर्वात जास्त रेटिंग आहे. हेच कारण आहे की, ‘टीव्हीएफ’ इतर प्रॉडक्शन हाऊसेसच्या तुलनेत अव्वल स्थानी आहे. या सर्व मालिकांना केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही रसिकांचे प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद लाभला आहे.

'सपने वर्सेस एव्हरीवन' या मालिकेने अधिकृतपणे ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांच्या यादीत प्रवेश केला आहे आणि सध्या ‘आयएमडीबी’च्या सर्वात लोकप्रिय २५० टीव्ही मालिकांमध्ये सर्वोच्च रेटिंग संपादन केले आहे. प्रेक्षकसंख्या, प्रेक्षकांचा सहभाग, सर्वोच्च रेटिंग, प्रेक्षकांची विस्मयकारक समीक्षा आणि तांत्रिक पैलू या सर्व परिमाणांमध्ये या मालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.