शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 07:57 PM2021-12-23T19:57:49+5:302021-12-23T19:58:24+5:30

'ह्युमन' (Human) एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडत जाते. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते.

Shefali Shah and Kirti Kulhari will be seen in the medical drama 'Human' | शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये

शेफाली शाह आणि किर्ती कुल्हारी दिसणार मेडिकल ड्रामा 'ह्युमन'मध्ये

googlenewsNext

डिस्ने+ हॉटस्टारने त्यांच्या आगामी थरारक मेडिकल ड्रामा 'ह्यूमन' (Human Webseries)ची घोषणा केली असून उत्कृष्ट प्रतिभावान अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) सह राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) मुख्य भूमिकेत असणार आहे. ही पॉवर पॅक्ड सीरिज सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि विपुल अमृतलाल शाह आणि मोजेझ सिंग यांनी दिग्दर्शित केली आहे. मोझेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी या मालिकेचे लेखन केले असून 'ह्युमन' एक मालिका म्हणून वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडत जाते. ही सीरिज वैद्यकीय नाट्यमय जग आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम यावर भाष्य करते.

या सीरिजबद्दल निर्माता आणि सह-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह म्हणाले की, "मी ३ वर्षे 'ह्युमन'च्या स्क्रिप्टवर एक चित्रपट म्हणून काम करत होतो तेव्हा मला लक्षात आले की याचा विषय दोन ते अडीच तासाच्या चित्रपटामध्ये बसवता येणे शक्य नाही. त्यानंतर मी मोजेझ सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना स्क्रिप्ट दिली. त्यांनी ती वाचली आणि त्यांना ती खूप आवडली. मोसेस सिंग यांनी इशानी बॅनर्जी यांना टीममध्ये घेतले, त्यानंतर स्तुती नायर आणि आसिफ मोयल यांनी ही सीरिज लिहायला सुरुवात केली. आम्हाला या सीरिजमध्ये वैद्यकीय जगाचे अचूकपणे प्रतिनिधित्व करतानाच यातील पात्रांचे वैयक्तिक नातेसंबंध आणि त्यांच्या संघर्षाचे देखील चित्रण करायचे होते. आणि आम्हाला विश्वास आहे आणि आशा आहे की प्रेक्षकांना ही सीरिज नक्कीच आवडेल.”

Web Title: Shefali Shah and Kirti Kulhari will be seen in the medical drama 'Human'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.