Join us

मुंबईत घर घेणं हा 'स्कॅम'! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, "हे महागडं स्वप्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 15:46 IST

मुंबईत  घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सामान्यच नाही तर अगदी सेलिब्रिटींची सुद्धा मुंबईतील घराची इच्छा असते.

मुंबईत  घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं. विशेषत: जे कामानिमित्त मुंबईत राहतात त्यांना या शहरात आपलं हक्काचं घर असावं असं वाटतं. सामान्यच नाही तर अगदी सेलिब्रिटींची सुद्धा मुंबईतील घराची इच्छा असते. काहींना ते परवडतं तर काहींना नाही. यासंदर्भात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं ट्वीट सध्या व्हायरल होतंय. मुंबईत घर घेणं हा स्कॅम असल्याचं ती म्हणाली आहे.

'स्कॅम १९९२','द फॅमिली मॅन' अशा वेबसीरिजमधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary). तिने नुकतंच एक ट्वीट केलं आहे. ती लिहिते, "मला हे सांगावं वाटतंय की मुंबईत घर विकत घेणं हा स्कॅम आहे. आणि हे माहित असूनही मला माझं हे महागडं स्वप्न पूर्ण करायचं आहे याचा मला राग येतोय."

श्रेयाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. अनेकांनी तिच्या या वक्तव्याला समहती दर्शवली. तसंच मुंबईच काय आज कोणत्याही मेट्रो शहरात घर घेणं हा स्कॅम असल्याचं काहींनी म्हटलं आहे. 

श्रेया धन्वंतरीला मनोज वाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' सीरिजमधील झोया या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. नंतर हंसल मेहता यांच्या गाजलेल्या 'स्कॅम 1992' सीरिजमध्ये तिने साकारलेली पत्रकार सुचेता दलालची भूमिका सर्वाना विशेष आवडली. यानंतर ती 'गन्स अँड गुलाब', 'मुंबई डायरीज' या सीरिजमध्येही दिसली. आता श्रेयाचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे ज्यासाठी ती मेहनत घेत आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीमुंबईसुंदर गृहनियोजन