Join us

६ हृदयस्पर्शी कथा अन् बरंच काही! श्रेयस तळपदे-प्रिया बापटच्या 'जिंदगीनामा' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 11:30 IST

श्रेयस तळपदे आणि प्रिया बापटची भूमिका असलेल्या 'जिंदगीनामा' या वेबसीरिजच्या ट्रेलरची चर्चा आहे (zindaginama)

सध्या मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमावत आहेत. ओटीटी माध्यमावर मराठी कलाकारांच्या हिंदी भाषेतील अनेक वेबसीरिज पाहायला मिळत आहेत. अशातच अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रिया बापट यांची 'जिंदगीनामा' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये सहा छोट्या कथा बघायला मिळणार असून प्रिया आणि श्रेयस तळपदे या वेबसीरिजमध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

'जिंदगीनामा' वेबसीरिजचा ट्रेलर

सोनी लिव्हवर 'जिंदगीनामा' वेबसीरिजचा ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये मानसिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या सहा कथा पाहायला मिळणार आहेत. या कथा हृदयस्पर्शी असणार आहेत. या वेबसीरिजमध्ये श्रेयस तळपदे, प्रिया बापट, उर्मिला कोठारे हे मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत. श्रेयस, प्रियाच्या दमदार अभिनयाची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळतेय. त्यामुळे सहा कथांची ही अनोखी वेबसीरिज बघायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.

कधी रिलीज होणार ही वेबसीरिज

अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित 'जिंदगीनामा' वेबसीरिज १० ऑक्टोबरला सोनी लिव्ह या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. श्रेयस, प्रियासोबतच या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, उर्मिला कोठारे, लिलित दुबे, सुमीत व्यास, अंजली पाटील, इवांका दास, मोहम्मद समद, शिवानी रघुवंशी हे लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य सरपोतदार यांनी या सीरिजमधील एका शॉर्ट कथेचं दिग्दर्शन केलंय.

टॅग्स :श्रेयस तळपदेप्रिया बापटवेबसीरिजउर्मिला कानेटकर कोठारे