Join us

सोनाक्षी सिन्हाचं वन शॅाट 'तिलस्मी बाहें', 'हिरामंडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:44 IST

Sonakshi Sinha : संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या मालिकेतील 'तिलस्मी बाहें' हे गाणे रिलीज झाले आहे, जे सोनाक्षी सिन्हाने एका टेकमध्ये पूर्ण केले आहे.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही मालिका १ मे रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. या मालिकेतील 'तिलस्मी बाहें' हे गाणे रिलीज झाले आहे, जे सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने एका टेकमध्ये पूर्ण केले आहे. आता अभिनेत्रीने सांगितले आहे की सुरुवातीला गाण्याची कोरिओग्राफी खूप वेगळी होती, पण शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळी त्या कोरिओग्राफीवर नाराज होते. त्यांनी शेवटच्या क्षणी संपूर्ण गाण्याची कोरिओग्राफी बदलली आणि ते एका टेकमध्ये शूट केले.

संजय लीला भन्साळींची 'हिरामंडी - द डायमंड बाजार' ही पहिली वहिली वेबसीरिज उद्या रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये भन्साळींनी काही अनोखे प्रयोग केल्याची चर्चा होती. त्यापैकी एक प्रयोग 'तिलस्मी बाहें...' या गाण्यात पाहायला मिळतो. सोनाक्षी सिन्हावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे रसिकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. 

या गाण्याबाबत सोनाक्षी म्हणाली की, 'तिलस्ली बाहें...' हे गाणं वन शॅाट शूट करण्यात आलं आहे. 'हिरामंडी'चं शूटिंग सुरू असताना भन्साळींनी हे गाणं वन शॅाट शूट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गाणं सुरू झाल्यापासून कॅमेरा एखाद्या प्रवाहासारखा दृश्ये टिपत असल्याचं पाहायला मिळतं असंही सोनाक्षी म्हणाली. यातील सोनाक्षीचा डान्स लक्ष वेधून घेतो. गाणं वन शॅाट शूट झाल्यानंतर भन्साळींसह चित्रपटाच्या संपूर्ण क्रू टिमने स्टँडिंग ओवेशन दिल्याचंही सोनाक्षीनं सांगितलं.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासंजय लीला भन्साळी