नीरज पांडे(Neeraj Pandey)च्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'खाकी: द बंगाल चॅप्टर' (Khakee The Bengal Chapter) या वेबसीरिजबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सीरिजमध्ये एका लोकप्रिय क्रिकेटपटूचे नाव जोडले गेले आहे. खरेतर, त्याच्या नावाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होताना दिसत होती. शेवटी, आता निर्मात्यांनी प्रोमोद्वारे स्पष्ट केले आहे की त्याचे या मालिकेशी काय संबंध आहे. ज्या क्रिकेटपटूचे नाव नेटफ्लिक्सच्या बहुप्रतीक्षित सीरिजशी जोडले जात आहे तो दुसरा कोणी नसून सौरव गांगुली (Sourav Ganguly) आहे.
बंगालवर आधारीत असलेल्या सीरिजमध्ये सौरव गांगुली केमिओ करणार असल्याचं आधी ऐकलं होतं, मात्र आता त्यात तो केमिओ करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाकी: द बंगाल चॅप्टरमधून सौरव गांगुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो खाकी गणवेशात दिसत आहे. प्रोमोमध्ये तो म्हणताना दिसतो आहे की, 'तुम्ही बंगालवर शो करणार आहात आणि तुम्ही बंगालचे दादालाच बोलवायला विसरलात.' यानंतर तो चित्रपटाच्या सेटवर पोहोचतो. जिथे दिग्दर्शक त्याला भूमिका द्यायला तयार असतो. पात्राची चर्चा होत असताना त्याला राग दाखवण्यास सांगितले जाते. याला प्रत्युत्तर म्हणून गांगुली जोरजोरात ओरडू लागतो, त्यामुळे सेटवरचे वातावरण मजेशीर बनते. प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट दिसला, जेव्हा त्याला एका गुंडाला मारहाण करण्यास सांगण्यात आले. यासाठी गांगुली त्याच्या क्रिकेटमधील लोकप्रिय शॉट्सचे नाव घेतो, परंतु जेव्हा त्याला हे सर्व फक्त ८ सेकंदात करायचे असल्याचे सांगण्यात आले तेव्हा त्याने रोल करण्यास नकार दिला. यानंतर, दिग्दर्शकाने त्याला सीरिजमध्ये सामील होण्यासाठी एक नवीन भूमिका दिली, ज्यासाठी त्याने लगेच होकार दिला.
खरेतर सौरव गांगुली या वेबसीरिजमधील कलाकारांचा भाग नाही, परंतु त्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे. नीरज पांडेच्या मोस्ट अवेटेडसीरिजमध्ये रवी किशन, करण टकर, अविनाश तिवारी, अभिमन्यू सिंग आणि आशुतोष राणा सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी नवीन प्रोमोसह मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख देखील शेअर केली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर २० मार्च, २०२५ रोजी भेटीला येईल.