Join us

'स्क्विड गेम्स' गाजलेल्या वेब सीरिजमधील 'या' कलाकाराचं निधन, साकारली महत्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:26 IST

'स्क्विड गेम्स' सीरिजने प्रत्येकालाच खिळवून ठेवलं आहे. याच सीरिजमधल्या एका पात्राचं निधन झालं आहे.

ओटीटी विश्वात सर्वात चर्चेतली आणि गाजलेली वेब सीरिज म्हणजे 'स्क्विड गेम्स' (Squid Games). या सीरिजचा दुसरा सीझन काही दिवसांपूर्वी आला. हाही सीझन प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. या कोरियन सीरिजची संकल्पनाच भन्नाट होती ज्यामुळे प्रत्येकालाच सीरिजने शेवटपर्यंत खिळवून ठेवलं. दुसरा सीझन अर्धवट संपवला असून याच वर्षी गोष्टीचा शेवट दाखवणार आहेत. दरम्यान सीरिजमधील एका कलाकाराचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे.

'स्क्विड गेम्स' मध्ये फ्रंटमॅन हे मुख्य पात्र आहे. याच फ्रंटमॅनच्या आईच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ली जो शिल (Lee joo sil) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाढतं वय आणि काही आजारांचाही त्या सामना करत होत्या. आपल्या धाकट्या घरीच त्या राहत होत्या. काही नर्स त्यांची देखभाल करण्यासाठी उपलब्ध होते. त्या वैद्यकीय निगराणीखालीच होत्या. काल सकाळी १० च्या सुमारास अचानक त्रास सुरु  झाला आणि काही क्षणात त्यांची प्राणज्योत मालवली.

ली जो शिल यांना १९९३ मध्येही गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. त्यांनी स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती.  वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत त्या जगल्या. सर्वात लोकप्रिय अशा सीरिजमध्येही त्यांनी काम केलं. त्या व्हॉइस ओव्हर आर्टिस्टही होत्या. त्यांनी 'नोटबूक फ्रॉम माय मदर','क्लाउन ऑफ अ सेल्समॅन','द अनइनवायटेड होमेज' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :वेबसीरिजमृत्यूसेलिब्रिटी