Join us

"अनेक वर्ष झाली पण.."; सनी देओल असं काय बोलून गेला की बॉबीचे डोळे पाणावले, पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 13:38 IST

सनी देओल बोलता बोलता मनातली एक खास गोष्ट बोलून गेला की बॉबी देओलचे डोळे पाणावले. काय झालंय बघा... (sunny deol, bobby deol)

'द ग्रेट इंडियन कपिल शो' सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत आमिर खान, दिलजीत दोसांज, परिणीती चोप्रा, विकी कौशल, रणबीर कपूर असे अनेक कलाकार सहभागी झालेत. आता या शोच्या नवीन एपिसोडमध्ये सनी - बॉबी ही देओल भावंडं सहभागी होणार आहेत. यावेळी या दोघांनी कपिल आणि त्याच्या टीमसोबत मजा - मस्ती केलीच. शिवाय सनी आणि बॉबीमधला भावूक संवादही बघायला मिळाला. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये सनी देओल  - बॉबी देओल सहभागी झाले होते. शोच्या नवीन प्रोमोत पाहायला मिळतंय की, सनी बोलता बोलता देओल कुटुंबाच्या सिनेकारकीर्दीविषयी सांगतो. सनी म्हणाला, “आम्ही 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहोत. गेली अनेक वर्ष आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण तरीही काही गोष्टी मनासारख्या घडत नव्हत्या. मग यावर्षी माझ्या मुलाचे लग्न झाले. त्यानंतर गदर 2 रिलीज झाला, त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला (रॉकी और रानी की प्रेम कहानी), पुढे बॉबी देओलचा अॅनिमल आला. आणि आम्हाला इतके आशीर्वाद कसे मिळाले यावर विश्वासच बसत नाही."

सनी देओल हे बोलत असतानाच बॉबी देओलच्या डोळ्यातून पाणी आलं. तो ढसाढसा रडला. पुढे उपस्थित लोकांनी सनी - बॉबीसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि बॉबीने डोळे पुसले. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' शोचा हा नवीन एपिसोड ४ मेला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. सनी लवकरच 'रामायण' सिनेमात बजरंगबलीच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. तर बॉबीच्या आगामी 'कंगुआ' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :बॉबी देओलसनी देओलप्राण्यांवरील अत्याचार