Join us

बाप-लेकीमधला सत्तेसाठीचा अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 18:23 IST

City Of Dreams 3 : सत्तेसाठीची भूक, विश्‍वासघात आणि शक्तिशाली गायकवाड हे लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सीझनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

अभिनेत्री प्रिया बापट(Priya Bapat)ची राजकारणावर आधारीत वेबसीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’(City Of Dreams)चा पहिला आणि दुसरा भाग सीझन हिट ठरला होता. या सीरिजची सर्वत्र खूप चर्चा झाली होती. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यानंतर आता लवकरच याचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्तेसाठीची भूक, विश्‍वासघात आणि शक्तिशाली गायकवाड हे लवकरच सिटी ऑफ ड्रीम्स (City Of Dreams 3)च्या तिसऱ्या सीझनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

सिटी ऑफ ड्रिम्सच्या तिसऱ्या भागात गुंतागूंतीची पात्रं, वैयक्तिक संबंध आणि काही अनपेक्षित ट्वीस्‍ट पाहायला मिळणार आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स सीझन ३’ यात राजकारणामध्‍ये सत्ता मिळवण्‍याकरिता अंतिम लढा पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरिज लवकरच डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट ही पौर्णिमा आम्रे-गायकवाड हे पात्र निभावताना दिसणार आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.

सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुन्नूर यांनी केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्सचा तिसरा सीझन पाहणे कमालीचे ठरणार आहे.
टॅग्स :प्रिया बापटअतुल कुलकर्णी