Join us

'सेक्रेड गेम्स'चा येणार नाही तिसरा सीझन, गणेश गायतोंडे फेम नवाजुद्दीन सिद्दीकीनं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 9:11 AM

Sacred Games Webseries :अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने 'सेक्रेड गेम्स'द्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश केला. या थ्रिलर मालिकेत त्याने साकारलेल्या गणेश गायतोंडे या व्यक्तिरेखेने खळबळ उडवून दिली. त्याचा दुसरा सीझनही लोकांच्या मागणीनुसार आला आणि प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून 'सेक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(Nawazuddin Siddiqui)ने 'सेक्रेड गेम्स'(Sacred Games)द्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश केला. या थ्रिलर मालिकेत त्याने साकारलेल्या गणेश गायतोंडे या व्यक्तिरेखेने खळबळ उडवून दिली. त्याचा दुसरा सीझनही लोकांच्या मागणीनुसार आला आणि प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून 'सेक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. पण तिसरा सीझन येणार का? नवाजुद्दीन सिद्दीकी ओटीटीच्या जगात पुनरागमन करेल का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अभिनेत्याने एका मुलाखतीत दिली.

नवाजुद्दीनने अलीकडेच ओटीटी प्लेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आता 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन येणार नाही. यामागचे कारण काय, हेही सांगितले. 'सेक्रेड गेम्स' हे विक्रम चंद्र यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे, जे एका शहराचा ४० वर्षांचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सांगतो. या मालिकेच्या कथेचा केंद्रबिंदू मुंबईचे अंडरवर्ल्ड असून धार्मिक संबंधांपासून ते व्यावसायिक आणि राजकीय संबंधांपर्यंतच्या चढ-उतारांवरही यात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मालिकेचा प्रेक्षकांवर खोलवर प्रभाव पडला आणि ती खूप पसंत केली गेली.

तिसऱ्या सीझनबद्दल नवाज म्हणाला...'सेक्रेड गेम्स'च्या तिसऱ्या सीझनबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, 'दोन सीझननंतर माझ्या दिग्दर्शकालाही कंटाळा आला आणि तिसरा सीझन बनवू नये, असं वाटलं. आणि सर्व कलाकारांनी सीझन ३ला नाही म्हटले. जे झाले ते झाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी देखील त्याच ओळी पुन्हा करू इच्छित नाहीत. क्रिएटिव्ह लोकांना सहज कंटाळा येतो. अनेकांनी मला 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन बनवण्यास सांगितले. पण भाऊ, 'सेक्रेड गेम्स'चा तिसरा सीझन येणार नाही. जे संपले ते झाले.'

या अटीवर नवाजुद्दीन करणार ओटीटीवर काम नवाजुद्दीन सिद्दीकीनेही ओटीटीवर आक्षेपार्ह भाषा आणि शिवीगाळ केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, 'आम्ही याची सुरुवात केली असली तरी आता कोणी मला अपशब्दांनी भरलेली ओटीटी मालिका करायला सांगितली तर मी नकार देईन.' नवाजुद्दीन झी5 वर रिलीज झालेल्या 'रौतू का राज' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसला होता.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीसॅक्रेड गेम्स