Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:37 IST

ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या वेब सीरिजच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तिने शेअर केले आहेत.

'ठिपक्यांची रांगोळी' ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रचंड गाजली. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मालिकेतील अप्पूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतूनच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरला लोकप्रियता मिळाली. या मालिकेने तिला प्रसिद्धीझोतात आणलं. या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ज्ञानदाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. एका हिंदी वेब सीरिजमध्ये ज्ञानदाची वर्णी लागली आहे. 

ज्ञानदाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या वेब सीरिजच्या सेटवरील व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तिने शेअर केले आहेत. ज्ञानदा 'कमांडर करण सक्सेना' या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती मिली हे पात्र साकारताना दिसणार आहे. 

छोटा पडदा गाजवलेली ज्ञानदा आता ओटीटीवरून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. "लोक मला विचारायचे आता पुढे काय? माझी पहिली हिंदी वेब सीरिज, आपली पहिली हिंदी वेब सीरिज- 'कमांडर करण सक्सेना'. 'कमांडर करण सक्सेना'मधील मिली तुम्हाला भेटायला येत आहे. ", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ज्ञानदाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. 

'कमांडर करण सक्सेना' वेब सीरिज ८ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कमांडर करण सक्सेना' सीरिजमध्ये अभिनेता  गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारवेबसीरिजसेलिब्रिटी