'हॉटस्टार'वर एका सीरिजने धुमाकूळ घातला आहे. आंतरजातीय प्रेम, धोका आणि करिअर अशा विषयावर आधारित 'ठुकरा के मेरा प्यार' सीरिजची चर्चा आहे. धवल ठाकूर आणि संचिता बसू या दोन कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सीरिजमधील कुलदीपची भूमिका साकारणारा मुख्य अभिनेता धवल ठाकूर हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा भाऊ आहे हे तुम्हाला माहितीये का?
'ठुकरा के मेरा प्यार' सीरिजचे आतापर्यंत १९ एपिसोड्स रिलीज झाले आहेत. पुढील एपिसोड्सचं शूटिंग आता सुरु झालं आहे. सीरिजमध्ये कोणीही बडा कलाकार नाही पण तरी याची गोष्ट, कलाकारांचा अभिनय यामुळे सीरिज प्रचंड गाजली. दरम्यान सीरिजमध्ये कुलदीप कुमार या मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता धवल ठाकूर (Dhawal Thakur) हा अभिनेत्री मृणाल ठाकूरचा (Mrunal Thakur) चुलत भाऊ आहे. भाऊ बहिणीचा बाँड अनेकदा सोशल मीडियावरही दिसून आला आहे. इतकंच नाही तर सीरिज आली तेव्हा मृणालने धवलसाठी खास पोस्ट लिहीत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आता नुकतंच मृणालने तिच्या वडिलांच्या वाढदिवशी पोस्ट केली आहे. यामध्ये तिच्यासोबत धवलही दिसत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत 'धवल तुझा भाऊ आहे का?' असं विचारलं आहे.
अभिनेता धवल ठाकूर याआधी 'दुरंगा' आणि 'लक बाय चान्स' सारख्या प्रोजेक्टमध्येही दिसला आहे. 'ठुकरा के मेरा प्यार' ने त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली आहे. सध्या तो सीरिजच्या पुढच्या भागांचं शूट करत आहे.
सीरिजबद्दल
सीरिजमध्ये कुलदीप कुमार आणि सान्विका यांची प्रेमकहाणी आहे. कुलदीप गरीब कुटुंबातील असून सान्विका श्रीमंत घराण्यातली असते. सान्विकाच्या घरी तिच्या अफेअरबद्दल समजताच तिचं कुटुंब कुलदीप आणि त्याच्या आईवडिलांना मारहाण करतात. त्यांचं घर पेटवून देतात. दुसरीकडे सान्विका कुलदीपवर प्रेम करत नाही असं सांगते. नंतर कुलदीप दुसऱ्या शहरात राहतो. आणि काही वर्षांनी थेट IAS बनून पुन्हा त्याच गावात परत येतो आणि सान्विकाचा बदला घेतो. पण सान्विका खोटं का बोलते याचं सत्य त्याच्यासमोर येतं. पण तोवर सान्विकाच्या मनातही बदल्याची भावना असते त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.