Join us

'चिड़िया उड़' वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज, जॅकी श्रॉफ दिसले भयानक अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:59 IST

Chidiya Udd Trailer : जॅकी श्रॉफ रवी जाधव दिग्दर्शित 'चिडिया उड' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. यात सिकंदर खेरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'चिडिया उड'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

सध्या अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) 'बेबी जॉन' (Baby John Movie) या चित्रपटात दिसत आहेत, ज्यामध्ये ते खलनायकाच्या भूमिकेत आणि वरुण धवनसोबत लढताना दिसत आहे. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक होत असले तरी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप झाला. आता जॅकी श्रॉफरवी जाधव दिग्दर्शित 'चिडिया उड' (Chidiya Udd Web Series) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. यात सिकंदर खेरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच 'चिडिया उड'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

वेबसीरिजची कथा १९९० च्या दशकातील मुंबईतील भयानक जगावर आधारलेली आहे. त्यात अंडरवर्ल्ड, वेश्याव्यवसायाच्या दुनियेतील अनामिक गल्ल्या, खेड्यातील मुलींच्या अनंत वेदना आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड आहे. निर्मात्यांनी एक दिवस आधी त्याचा टीझरही रिलीज केला होता. आता ट्रेलर रिलीजसोबतच रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या वेबसिरीजची कथा मोहिंदर प्रताप सिंग आणि चिंतन गांधी यांनी लिहिली आहे. 'चिडिया उड' ही सीरिज आबिद सुर्ती यांच्या 'केज' या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. जॅकी श्रॉफ खलनायक तर भूमिका मीना मुख्य भूमिकेत आहेत. यात सिकंदर खेर, मधुर मित्तल, मयूर मोरे आणि मीता वशिष्ठ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

कधी आणि कुठे पाहता येईल सीरिज?बावेजा स्टुडिओच्या बॅनरखाली बनलेली 'चिडिया उड' वेबसीरिज १५ जानेवारी, २०२५ रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारच्या सबस्क्रिप्शनची गरज नाही.  

टॅग्स :जॅकी श्रॉफरवी जाधव