Join us

सुनील शेट्टीची नवीन सीरिज 'हंटर'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 9:14 PM

सुनील शेट्टीची नवीन सीरिज हंटर: टूटेगा नही, तोडेगाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला.

सुनील शेट्टी(Suniel Shetty)ची नवीन सीरिज हंटर: टूटेगा नही, तोडेगा(Hunter)चा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. सुनील शेट्टी सोबतच ईशा देओल, राहुल देव, बरखा बिश्त आणि करणवीर शर्मा महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतील. या साहसी-थरारक ट्रेलर यामधील वास्तववादी, प्रभावशाली आणि थक्क करणारी साहस दृश्यं यात पाहायला मिळतील. प्रिन्स धीमन आणि आलोक बत्रा यांचे दिग्दर्शन असलेली ही सीरिज सारेगामा इंडिया लिमिटेड’चा सिने विभाग, योडले फिल्म्सची निर्मिती असून तिचा प्रीमियर अॅमेझॉन मिनी टीव्हीवर २२ मार्चला होणार आहे.

 कुटुंबाच्या भूतकाळातील घटनांनी ट्रेलरची सुरुवात होते, हा ट्रेलर थेट एसीपी विक्रमच्या जगात प्रवेश करतो. त्याला खोट्या गुन्ह्यात अडविण्याचा प्रयत्न आहे, एक जुनी भानगड झटकून स्वत:चा रस्ता साफ करण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. ट्रेलरमधून पोलिसाची देहबोली, दणकटपणा आणि वर्तन चपखल दिसून येते. त्याचे रांगडेपण आणि शेवटपर्यंत लढण्याची वृत्ती अधोरेखित होते. हा पोलीस म्हणजे जणू वन मॅन आर्मी! हा ट्रेलर आपल्या प्रेक्षकांना मजबूत साहसी प्रसंगातून सिने प्रवासाची सैर घडवून आणेल. या ट्रेलरला गुन्ह्याची काळी किनार लाभलेली आहे, गुपित खोलवर असून कथेची भिस्त सत्यावर आहे.  

सुनील शेट्टी म्हणाले, जणू ही कालची गोष्ट असावी की आम्ही शूटींग करत होतो आणि आज आम्ही कार्यक्रमाचा ट्रेलर प्रसिद्ध करत आहोत. हा ऑन-ऑफ सेटवर इतक्या प्रतिभावंत लोकांसमवेत कामाचा अनुभव आणि प्रवास नक्कीच विशेष होता. माझी व्यक्तिरेखा फारच रोचक असून या अभिनेत्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक प्रेक्षकासाठी मेजवानी ठरेल. एसीपी विक्रम सिन्हाची भूमिका वठवताना खूप धमाल आली. हा बहुप्रतिक्षित शो पाहताना प्रेक्षकांना मजा येईल ही आशा व्यक्त करतो.हंटर: टूटेगा नही, तोडेगा’चा भाग असण्याचा अनुभव छान होता आणि हा माझा सन्मान समजतो. सगळ्या व्यक्तिरेखा विचारपूर्वक आणि सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करण्यात आल्या असून माझे पात्र हे चपळ बुद्धी असलेले आहे, त्यांचे स्वत:चे असे रूल-बुक आहे आणि त्याला स्वत:चे नियम पाळायला आवडतात. या कार्यक्रमाच्या कथानकाला पकड आहे, त्यातील व्यक्तिरेखा नेहमीच्या असल्या तरीही एक ‘ट्विस्ट’ आहे, असं राहुल देव सांगतो. ईशा देओल म्हणाली, वेळ कशी झटपट निघून जाते. आम्ही सगळे या दिवसाची वाट पाहत होतो, आणि हा दिवस उगवला. मी खूप उत्सुक होते की ट्रेलर प्रसिद्ध झाला, प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्याची घाई आम्हाला होती. मी तर झटपट होकार कळवला होता, कारण कथानकाचा अंदाज लावणे कठीण होते, दुसरी गोष्ट म्हणजे त्यातील पात्रं इतकी वेगळी तरीही पटकन आवडणारी आहेत. प्रेक्षकांना पाहताना नक्कीच मजा येणार आहे.
टॅग्स :सुनील शेट्टी