Join us

इंग्रजीमध्येही रिलीज झाला Animal, रणबीरच्या भूमिकेसाठी 'या' टीव्ही अभिनेत्याने दिला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 17:07 IST

काल Animal इंग्लिश व्हर्जनमध्येही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.

संदीप रेड्डी वांगा यांचा Animal सिनेमा मध्यंतरी चांगलाच चर्चेत होता. त्याआधी त्यांच्या 'कबीर सिंह' सिनेमाचीही खूप चर्चा झाली होती. वांगा यांच्या सिनेमात महिलांना ज्याप्रकारे दाखवलं जातं त्यावरुन अनेकदा त्यांच्यावर टीका झाली आहे. मात्र सध्या ते प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देत आहेत. रणबीर कपूरचा Animal सिनेमा आता इंग्रजीतही डब करण्यात आला आहे. यामध्ये रणबीरच्या भूमिकेला लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याने आवाज दिला आहे. कोण आहे तो अभिनेता?

गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी Animal सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाने ५०० कोटींचा व्यवसाय केला. काही दिवसांपूर्वीच सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. तर काल Animal इंग्लिश व्हर्जनमध्येही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. विशेष म्हणजे सिनेमाच्या इंग्रजी डबसाठी रणबीर कपूरने आवाज दिलेला नाही. तर लोकप्रिय टीव्ही अभिनेता नकुल मेहताने (Nakul Mehta) रणबीरच्या भूमिकेसाठी आवाज दिला आहे. 

'बडे अच्छे लगते है' मालिकेतील मुख्य अभिनेता नकुलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. सिनेमाच्या डबिंगसाठी त्याला जवळपास दोन आठवडे लागले. त्याने Animal चा व्हिडिओ शेअर करत रणबीरच्या कामाचं भरभरुन कौतुक केलं. नकुलने गेल्या महिन्यात Animal साठी इंग्रजीत डबिंग केलं. 

नकुल मेहता 'बडे अच्छे लगते है' मालिकेमुळे घराघरात पोहोचला. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. Animal मध्ये त्याचा आवाज ऐकून नकुलचे चाहतेही खूश झालेत. इतर कलाकार आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकाररणबीर कपूरसिनेमाइंग्रजीनेटफ्लिक्स