२०२५ सुरु होऊन आता एक महिना उलटला आहे. या नवीन वर्षात नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी बघायला मिळणार आहे. काल नेटफ्लिक्सतर्फे ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला. या इव्हेंटमध्ये शाहरुख खान, आर्यन खानपासून आर.माधनव, जयदीप अहलावत अशा लोकप्रिय सुपरस्टार्सच्या आगामी प्रोजेक्ट्सची झलक दाखवण्यात आली. एकाच दिवशी १८ टीझर रिलीज करण्यात आले. वाचा संपूर्ण यादी.
नेटफ्लिक्सवर रिलीज होणार हे १८ प्रोजेक्ट्स
- ज्वेल थिफ- द हाइस्ट बिगिन्स: सैफ अली खानची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. वॉर आणि पठाण सिनेमे दिग्दर्शित करणारे सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चाकू हल्ल्यानंतर सैफ या प्रोजेक्टमधून कमबॅक करतोय
- राणा नायडू सीझन २- राणा दग्गुबाती आणि व्यंकटेश या कलाकारांची भूमिका असलेल्या गाजलेल्या राणा नायडू वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलीज होणार आहे. यावेळी अर्जुन रामपाल दिसणार आहे.
- टोस्टर- राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांचा आगामी सिनेमा टोस्टर या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशीही दिसणार आहेत.
- दिल्ली क्राईम सीझन ३- शैफाली शाहची प्रमुख भूमिका असलेल्या दिल्ली क्राईम या गाजलेल्या वेबसीरिजचा सीझन ३ या वर्षी रिलीज होणार आहे. हुमा कुरेशी या सीरीजमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणार आहे
- आप जैसा कोई- आर.माधवन आणि फातिमा साना शेख यांची प्रमुख भूमिका असलेला आप जैसा कोई सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दोन्हीही कलाकारांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळणार आहे.
- कोहरा सीझन २- २०२३ मध्ये आलेल्या कोहरा वेबसीरिजचा दुसरा सीझन या वर्षी रिलीज होणार आहे. बरुण सोबती आणि मोना सिंग या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.
- मंडला मर्डर्स- वाणी कपूर, सुरवीन चावला, वरुण राज गुप्ता, रघुवीर यादव अशा दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या मंडला मर्डर्सचा टीझर रिलीज करण्यात आला.
- अक्का- मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आणि साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश यांची भूमिका असलेल्या अक्काची घोषणा काल करण्यात आली. या सीरिजमध्ये हटके कहाणी दिसणार आहे.
- ग्लोरी- द्विवेंदू शर्मा आणि पुलकित सम्राट यांची भूमिका असलेल्या ग्लोरीचा टीझर रिलीज करण्यात आलाय. बॉक्सिंगवर आधारीत कथा ग्लोरीमध्ये बघायला मिळणार आहे.
- WWE ऑन नेटफ्लिक्स- लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडीचा विषय असलेला WWE हा शो नेटफ्लिक्सवर बघता येणार आहे. दिग्गज बॉक्सर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.
- खाकी- द बंगाल चॅप्टर: चित्रांगदा सिंग, प्रोसेनजीत या कलाकारांची भूमिका असलेला खाकी- द बंगाल चॅप्टरची काल घोषणा आली. रहस्यमय थ्रिलर असणारी ही वेबसीरिज आहे.
- द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३- सर्वांना खळखळून हसवणारा द ग्रेट इंडियन कपिल शोचा तिसरा सीझन लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, अर्चना पूरण सिंग, किकू शारदा हे कलाकार पुन्हा एकदा हसवायला सज्ज झालेत.
- द रॉयल्स: ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या द रॉयल्सची उत्सुकता शिगेला आहे. आगळंवेगळं कथानक द रॉयल्समध्ये बघायला मिळणार आहे.
- द टेस्ट- आर.माधवन आणि सिद्धार्थ हे साउथ इंडस्ट्री आणि बॉलिवूड गाजवणारे स्टार्स द टेस्टमधून आमनेसामने येणार आहेत. या दोघांशिवाय सिनेमात अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे.
- सुपर सुब्बू: मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरची भूमिका असलेला सुपर सुब्बूची काल घोषणा आली. सुपर सुब्बूमध्ये मिथिलासोबत मुरली शर्मा, संदीप किशन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.
- सारे जहाँ से अच्छा: प्रतीक गांधी, रजत कपूर, तिलोत्तमा शोमे यांची प्रमुख भूमिका असलेल्या सारे जहाँ से अच्छाच्या टीझरने सर्वांचं लक्ष वेधलंय. सत्य घटनेवर आधारीत हा प्रोजेक्ट दिसतोय.
- वीर दास फूल व्हॉल्यूम: प्रसिद्ध अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडियन वीर दासचा आगामी शो वीर दास:फूल व्हॉल्यूम नेटफ्लिक्सवर यावर्षी रिलीज होणार आहे.
- Bas***ds of Bollywood: सर्वांना सरप्राइज मिळालं ते शाहरुख खान आणि आर्यन खानच्या आगामी वेबसीरिजचं. Bas***ds of Bollywood एकदम हटके असून शाहरुख-आर्यन या बाप-लेकाची केमिस्ट्री बघायला मिळतेय.
अशाप्रकारे नेटफ्लिक्सवर काल तब्बल १८ प्रोजेक्टसची घोषणा करण्यात आली असून प्रेक्षकांना नवीन वर्षात २०२५ मध्ये मनोरंजनाची चांगली मेजवानी मिळणार यात शंका नाही.