Join us

'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुण धवनला कोणतंच सीक्रेट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:35 IST

समंथाने वरुण धवनविषयी मजेशीर गोष्टी सांगितल्या.

समंथा रुथ प्रभू (Samantha Rurh Prabhu) आणि वरुण धवन (Varun Dhawan) आगामी 'सिटाडेल : हनी बनी' मध्ये दिसणार आहेत. नुकतंच या शोचा ट्रेलर लाँच झाला. ट्रेलरमधील दोघांच्या अॅक्शन सीक्वेन्सने लक्ष वेधून घेतलंय. तसंच त्यांची जोडीही खूप इंटरेस्टिंग वाटत आहे. या ट्रेलर लाँच दरम्यान वरुण धवन आणि समंथाने दिलखुलास संवाद साधला. तेव्हा समंथाने वरुण धवनविषयी मजेशीर गोष्टी सांगितल्या.

'सिटाडेल' ट्रेलर लाँचवेळी समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुणला सीक्रेट ठेवणं जमत नाही. फॅमिली मॅन सीझन २ वेळीच सिटाडेलच्या भारतीय रुपांतरची चर्चा होती. मला तेव्हा माहित नव्हतं आणि वरुणला सगळं माहित होतं. जेव्हा वरुण धवनचा विषय असतो तेव्हा सगळ्यांनाच माहित आहे की त्याला सीक्रेट ठेवता येत नाही." 

वरुण धवन 'सिटाडेल' शोबद्दल म्हणाला, "खरं सांगायचं तर या शोसाठी समंथा असावी असं मला मनातून वाटत होतं. फॅमिली मॅन सीरिजचे दोन्ही सीझन बघितल्यानंतर मला सिटाडेल मध्ये काम करण्याची इच्छा झाली. मग मी तसं डी.के ला कळवलं."

7 नोव्हेंबर रोजी 'सिटाडेल'चा प्राईम व्हिडिओवर प्रीमियर होणार आहे. अमेरिकी सीरिज 'सिटाडेल'चं हे भारतीय व्हर्जन आहे. वरुण धवन, समंथा रुथ प्रभू, के के मेनन, साकिब सलीम, सिकंदर खेर, शिवांकित परिहार यांची सिनेमा मुख्य भूमिका आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीवरूण धवनवेबसीरिज