युट्यूबर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी 'मोस्टली सेन' म्हणजेच प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनेक वर्षांपासून ती मूळ नेपाळचा असलेला वृषांक खनालला (Vrishank Khanal) डेट करत आहे. त्याच्यासोबत ती आता कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सप्तपदी घेणार आहे. प्राजक्ता कधी आणि कुठे लग्न करणार वाचा.
प्राजक्ता कोळी ही ठाण्यातील मराठी कुटुंबात जन्माला आली. युट्यूबर ते अभिनेत्री आणि आता समाजसेविका अशी तिची नव्याने ओळख झाली आहे. आधी ती रेडिओ जॉकी म्हणून काम करत होती. नंतर तिने फुलटाईम युट्यूबर म्हणून काम सुरु केलं होतं. प्राजक्ताने पर्यायवरणविषयक अनेक उपक्रमांसाठी परदेशातही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. अगदी मिशेल ओबामांनाही ती भेटली आहे. प्राजक्ता कॉलेजमध्ये असल्यापासूनच वृषांक खनालला डेट करत आहे. १३ वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता आणिव वृषांक २५ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईजवळील कर्जत येथे त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. प्राजक्ता आणि वृषांकचे कुटुंबीय आणि दोघांच्या मित्र परिवाराला आमंत्रण आहे.\
प्राजक्ताचा होणारा नवरा काय करतो?
वृषांक खनाल काठमांडू, नेपाळचा आहे. प्राजक्ता आणि वृषांकने काही महिन्यांपूर्वीच नेपाळ येथे साखरपुडा केला. वृषांक वकील आहे. प्राजक्ता अनेकदा त्याला भेटण्यासाठी नेपाळला गेली आहे. एका कॉमन मित्राच्या घरी गणपतीसाठी गेले असता तिथे दोघांची भेट झाली होती.
प्राजक्ता माळीने लिहिलेलं 'टू गूड टू बी ट्रू' हे तिचं पहिलंच पुस्तक नुकतंच आलं. यासाठी तिला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय प्राजक्ताने काही हिंदी सिनेमा, सीरिजमध्येही काम केलं आहे. एकंदरच प्राजक्ता कोळी मल्टीटॅलेंटेड आहे.