प्राजक्ता कोळी (prajakta koli) ही बॉलिवूड आणि ओटीटीविश्व गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्यूबर आहे हे सर्वांना माहित आहे. प्राजक्ता कोळीच्या लग्नाची धामधूम गेल्या आठवडाभरापासून सुरु होती. अखेर काल (२५ फेब्रुवारी) प्राजक्ता कोळी बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत (vrushant khanal) लग्नबंधनात अडकली. प्राजक्ता कोळीच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. प्राजक्ताचं तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय.
प्राजक्ता कोळीचं लग्न
प्राजक्ता कोळीच्या लग्नाचे सुंदर फोटो कॅप्शनमध्ये २५.०२.२५ अशी लग्नाची तारीख पोस्ट केलीय. गेल्या ११ वर्षांपासून प्राजक्ता आणि वृषाल एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. प्राजक्ताने यशस्वी युट्यूबर म्हणून ओळख मिळवली. याशिवाय ती अनेक सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही झळकली. प्राजक्ताच्या या सर्व प्रवासात तिला वृषालने चांगलीच साथ दिली. अखेर काल एकमेकांशी लग्न करुन प्राजक्ता-वृषालने आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली.
निसर्गाशी संबंधित प्राजक्ताची वेडींग थीम होती. प्राजक्ताने लग्नात क्रीम कलरचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर पारिजातकाच्या फुलांचं डिझाईन होता. तर वृषांकने प्राजक्ताला साजेसा कुर्ता आणि फेटा परिधान केला होता. दोघांचा जोडा एकमेकांना शोभून दिसत होता. प्राजक्ताने अलीकडे 'मिसमॅच' या वेबसीरिजमध्ये अभिनय केलाय. याशिवाय वरुण धवन-कियारा अडवाणीच्या 'जुग जुग जियो' या सिनेमात प्राजक्ता कोळीने वरुणच्या बहिणीची भूमिका साकारली.