बॉलिवूड कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर (Karisma Kapoor) . उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत येणाऱ्या करिश्माचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. काही वर्षांपूर्वीच करिश्मा तिच्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाली. तेव्हापासून करिश्मा पुन्हा कधी लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. यामध्येच आता रणबीर(Ranbir Kapoor)-आलियाच्या (Alia Bhatt) लग्नात असा एक किस्सा घडला ज्यामुळे करिश्मा खरंच दुसऱ्यांदा लग्न करते की, काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अलिकडेच करिश्माने रणबीरच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये करिश्माचा एक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर करिश्मा दुसऱ्यांदा लग्न करणार असं म्हटलं जात आहे.
लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर
करिश्मा खरंच करणार का लग्न?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये करिश्माच्या हातात कलीरा असल्याचं पाहायला मिळत आहे. हा कलीरा नववधू तिच्या अविवाहित बहिणींच्या डोक्यावर पाडत असते. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हा कलीरा पडले त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच विवाह योग असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे करिश्माच्या हातात हा कलीरा पाहिल्यावर तिच्या डोक्यावर हा कलीरा पडल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, ‘इन्स्टाग्राम VS रिअॅलिटी, कलीरा माझ्यावर पडला मित्रांनो, असं कॅप्शन देत करिश्माने हा फोटो शेअर केला आहे. रणबीर आलियाच्या लग्नात करिश्माने उपस्थित सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी तिने ऑरेंज रंगाचं ब्लाऊज परिधान केलं होतं. सोबतच, तिने त्यावर ट्रान्सपरंट साडी परिधान केली होती.