'वेलकम' फ्रँचायझी ही बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक आणि मनोरंजक फ्रेंचायझींपैकी एक आहे यात काही शंका नाही. अक्षय कुमार, परेश रावल, अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असणाऱ्या या फ्रेंचायझीला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, यामधील विनोदी सीन्स आजही सिनेरसिकांना खळखळून हसवतात. अशातच, आज 'वेलकम'या फ्रेंचायझीच्या पहिल्या इंस्टॉलमेंटला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चाहत्यांनी चित्रपटातील ५ मनोरंजक क्षणांवर नजर टाकली आहे.
गाडीमधील विनोदी सीनचित्रपटातील हा सीन १६ वर्षांनंतरही सर्वात मनोरंजक आणि पोट धरून हसवणाऱ्या सीन्स पैकी एक आहे. यामध्ये, ब्रेक निकामी होणे, कुत्र्यांचा पाठलाग आणि लोकांचे ओरडणे यांसारख्या मजेशीर गोष्टी असून सिनेप्रेमींच्या आवडत्या सीन्स पैकी एक आहे.
रिश्ता कॅन्सलअक्षयच्या स्पोर्ट्स कारमध्ये प्रवेश करण्यापासून ते गुंडांसमोर अभिनय करण्यापर्यंत, हा सीन एक ट्विस्ट येण्यासाठी योग्य सेटअप ठरला. तसेच, अतिआत्मविश्वास किती अयोग्य आहे याचे उत्तम उदाहरणदेखील दर्शवतो. यामध्ये, अक्षय कुमार, परेश रावल आणि अनिल कपूर यांनी आपल्या उत्कृष्ट ह्यूमर आणि विनोदी कलेने मनोरंजन केले.
अनिल कपूर आणि अक्षय कुमारचा सामना'वेलकम'मधील अनिल कपूर एका गुंडाची व्यक्तिरेखा साकारत होते. या सीनमध्ये तो अक्षयला भावनिक अँगलसह धमकावताना तसेच, नंतर अक्षयला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याभोवती शूटिंग करताना पाहायला मिळते. यामध्ये अचानक भावनिक ते प्राणघातक झालेला बदल आणि अक्षय कुमारच्या चेहऱ्यावरील हास्यास्पद हावभाव या सीनला फारच मजेशीर बनवते.
मिरॅकल मिरॅकल मिरॅकल!या आयकॉनिक सीनमध्ये अक्षय कुमारच्या चेहऱ्यावरील विनोदी हावभाव आणि त्याचे मिरॅकल मिरॅकल (Miracle Miracle) ओरडणे आजही दर्शकांना खळखळून हसायला भाग पाडते. तसेच, पायाने आरडीएक्स (RDX)ची आग विझवण्याचा प्रयत्न विनोदी प्रकारे दाखवून चित्रपटातील हास्याचा दर्जा वाढवला होता.
क्लायमॅक्स'वेलकम'चे क्लोजिंग सीन्स हे बॉलीवूडमध्ये पाहिलेले सर्वात मजेशीर सीन्स आहेत यात काही शंका नाही. घरावर उभ्या असलेल्या अक्षय कुमारपासून ते नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांचे एकाच मुलीवर प्रेम होण्यापर्यंत या क्लायमॅक्सने प्रेक्षकांनी खळखळून हसवत सोडले.
अशातच, 'वेलकम'ला रिलीज होऊन १६ वर्षे पूर्ण होत असताना, फ्रँचायझीच्या आगामी 'वेलकम टू द जंगल'या नावाच्या इंस्टॉलमेंटचे चित्रीकरण सुरु आहे हे जाणून सिनेप्रेमींना आनंद झाला आहे. हा चित्रपट पहिल्या चित्रपटाच्या रिलीजच्या जवळपास १७ वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.