​‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 12:59 PM2016-09-27T12:59:08+5:302016-09-27T18:29:08+5:30

सवाद्य मिरवणूक  : रॅलीत उंट व अश्वारुढ तरुणांचा सहभाग; तनयची छबी टिपण्यासाठी गर्दी एका वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत ...

Welcome to the tune of 'Tanay Malhara' | ​‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत

​‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत

googlenewsNext

/>सवाद्य मिरवणूक  : रॅलीत उंट व अश्वारुढ तरुणांचा सहभाग; तनयची छबी टिपण्यासाठी गर्दी
एका वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत विजेता ठरलेल्या १४ वर्षीय जळगावचा दुलारा तनय मल्हाराचे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावात आगमन झाले. सजविलेल्या वाहनासह काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीला जोरदार प्रतिसाद लाभला. जळगावकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. तनयची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी विद्यार्थी व तरुणांनी एकच गर्दी केली होती. 

खान्देश सेंट्रलपासून निघाली मिरवणूक
तनय मल्हारा विजेता झाल्यानंतर त्याचे मंगळवारी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यानंतर एका वाहनाने तनय व त्याचे पालक खान्देश सेंट्रल मॉलजवळ पोहचले. त्या ठिकाणी तनयचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर एका सजविलेल्या वाहनावर तनय, आई नलिनी मल्हारा, वडील आनंद मल्हारा यांच्यासह परिवारातील सदस्य दाखल झाले.

उंट, घोडे व सवाद्य मिरवणूक
तनयच्या आगमनानंतर खान्देश सेंट्रल मॉल येथून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी अश्वधारी तरुण, उंट तसेच वाद्यपथक सहभागी झाले. त्यापाठोपाठ अनुभूती स्कूलचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ सजविलेल्या वाहनावर तनय व त्याचे कुटुंबीय जळगावकर नागरिकांना अभिवादन करीत होते.

ला.ना.चौकात विद्यार्थिनींची गर्दी
तनयच्या स्वागताची रॅली नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे नंदीनीबाई विद्यालयाजवळ आली. या ठिकाणी तनयला पाहण्यासाठी विद्यार्थिनींनी दोन्ही बाजूने गर्दी केली. अनेक विद्यार्थिनी व तरुण आपल्या मोबाईलमध्ये तनयची छबी टिपत होते. तसेच स्वागत मिरवणुकीची छायाचित्रण करीत होते.

रहदारीच्या खोळंब्यामुळे आमदारांचे वाहन अडकले
तनय मल्हारा याच्या स्वागत रॅलीमुळे दोन्ही बाजूला त्याला पाहण्यासाठी जळगावकरांची गर्दी होत होती. त्यामुळे या मार्गाने येणाºया वाहनांना दुसऱ्या बाजूने वळविण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीचा खोळंबा होत होता. १५ ते २० मिनीटे वाहने एकाच मार्गावर अडकून पडत असल्याने वाहनधारक पर्यायी मार्गाचा वापर करून वाहन काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यामुळे अधिक गोंधळ होत होते. त्यात आमदार सुरेश भोळे यांचे चारचाकी वाहन शिवतीर्थ मैदान ते जिल्हा क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सदरम्यान तब्बल १५ ते २० मिनीटे अडकून पडले होते. 

Web Title: Welcome to the tune of 'Tanay Malhara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.