Join us

क्या ‘कूल’ है हम!

By admin | Published: May 09, 2016 1:45 AM

सूर्यनारायण आता चांगलाच तळपतो आहे... अंगाची लाही लाही करणारं ऊन आणि घामाच्या धारा यामुळे सारेच हैराण झालेत. मग या उन्हापासून सेलिब्रिटी मंडळीसुद्धा कसे वाचतील?

सूर्यनारायण आता चांगलाच तळपतो आहे... अंगाची लाही लाही करणारं ऊन आणि घामाच्या धारा यामुळे सारेच हैराण झालेत. मग या उन्हापासून सेलिब्रिटी मंडळीसुद्धा कसे वाचतील? बरेच सेलिब्रिटी तर सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये बिझी असतात.. १२ ते १४ तास हे सेलिब्रिटी आउटडोअर असतात. अशा परिस्थितीत उन्हाच्या झळा त्यांनाही बसतात.. घरातून बाहेर सेटवर असताना सेलिब्रिटी मंडळी उन्हाचा सामना करताना काही स्मार्ट गोष्टी करत आहेत. त्या कुठल्या ते जाणून घेऊ यात...

हृता दुगुर्ळे (अभिनेत्री)उन्हाचा सामना करण्यासाठी साध्या मात्र तितक्याच गरजेच्या असलेल्या गोष्टी करते. सेटवर शूटिंगमध्ये कितीही बिझी असली तरी भरपूर पाणी पिण्यावर भर असतो. पाण्यासोबतच फळांचा ज्यूस आणि ताकही घेते. या गोष्टी खूप साध्या असल्या तरी उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला कूल ठेऊ शकतात.जुई गडकरी (अभिनेत्री)कितीही बिझी असली तरी जास्तीत जास्त पाणी प्यायला विसरत नाही. याशिवाय वेळोवेळी फळंही खाते. खासकरुन उन्हाळ्यात गारवा देणारं कलिंगड आवर्जून खाते. फळं खाण्याबरोबरच ज्यूस, जलजीरा, ताकाचे सेवनही करते. उन्हाचे चटके बसत असताना सब्जा आणि तुळशीच्या बियाही चमत्कारीकरित्या फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळं जुई सब्जा आणि तुळशीच्या बिया जवळ ठेवते. हे सगळं करत असताना आपल्या डोळ्यांची निगा ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. त्यामुळंच ठराविक वेळेनंतर डोळ्यावर पाणी मारते. त्यामुळं मेकअप असतानाही गार वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामुळं मन कूल आणि शांत राहतं.खुशबू तावडे (अभिनेत्री) उन्हाचा तीव्रता वाढली आहे. त्यामुळं 12 ते 3 या प्रचंड उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळते. आऊटडोअर शूटच्या वेळी कूल कसं राहता येईल याची काळजी घेते. 15 मिनिटांनी पाणी पित राहणं, नारळ पाणी, ताक आणि फळांचा ज्यूस घेत राहते. उन्हाळ्यात मसाल्याचे पदार्थ खाणं टाळते. डाएटवर खास लक्ष ठेवते. बाहेर पडताना सन्सक्रीम लावून आणि गॉगल घालूनच बाहेर पडते. चेहरा कपड्यानं बांधून ठेवणे, फूल स्लीव्हजचे कपडे घालणे असे उपायसुद्धा उन्हापासून तुमचं रक्षण करु शकतात. छोट्या छोट्या गोष्टींकडे खास लक्ष देत स्वत:ची, चेहऱ्याची, काळजी घेत उन्हाळा मी फुल आॅन एन्जॉय करते.नेहा राजपाल (गायिका) उन्हापासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणं हा बेस्ट पर्याय आहे. पाण्यासोबतच फळ खाणे आणि फळांचा ज्यूसही घेते. खासकरुन कलिंगड, संत्र्याचा ज्यूस, आंब्याचा रस, पन्हे, चिकू याचं सेवन करते. याशिवाय नारळ पाणी आणि ऊसाचा रसही आवर्जून घेते. उन्हाचा डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून गॉगलचा वापर करते आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घेते. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून रक्षण करण्यासाठी कॅप आणि छत्रीचाही वापर करते.जिया मानेक (अभिनेत्री) उन्हाळा अनेकांना त्रासदायक वाटतो.. मात्र त्याला त्रासदायक न मानता एन्जॉय केलं तर... नेमकं तेच मी करते त्यामुळं जास्त त्रास होत नाही. उन्हाळ्यात वारंवार तहान लागते. तरीही एकाचवेळी खूप पाणी जात नाही. त्यामुळं थोडं थोडं पाणी पिते. पाण्यापेक्षा लिंबू पाणी किंवा ग्लुकॉन डी घेणंही तितकंच फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात तेलकट पदार्थ टाळून हेल्दी फूड खाण्यावर अधिक भर देते. यासोबत व्यायामही या काळात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. मी खास करुन इनडोअर एक्सरसाईज, स्पेशली योगाभ्यास करते. त्यामुळं ताजंतवानं राहण्यास मदत होते. जेवणाच्या वेळा पाळणं ही तितकंच महत्त्वाचं असते. रात्रीचं जेवण 7 ते 9 या वेळेत करणं मला आवडतं. उन्हाळ्यात हेवी आणि डार्क मेकअप करणं टाळावं. त्यामुळं चेहरा खराब होण्याची शक्यता असते. पाण्याची बॉटल, सन्सक्रिम, गॉगल या उन्हाळ्यातील माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी.शीतल मौलिक (अभिनेत्री) उन्हाचा सामना करण्यासाठी माझा खास फंडा आहे.. तो ही तितकाच साधा आणि सोपा. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिते. त्यानंतर वेलची केळी, फळांचे ज्यूस, नारळ पाणी, ताक आणि काही इतर ज्यूसही घेते. या गोष्टी प्रत्येक जण करतच असतो. मात्र उन्हाचा सामना करण्यासाठी मी काही खास गोष्टी करते. दहा मिनिटे ध्यानधारणा आणि जवळपास अधार्तास योग करते. त्यामुळं मन शांत राहण्यास मदत होते. जेवणाच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करणं कधीही चांगलं. ते मी करते. जास्त मेकअप न करणं कधीही चांगलं.