बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला खूप मोठा धक्का बसला आहे. भलेही त्यांचे ब्रेकअप झाले होते पण अद्याप तिच्या मनात सुशांतसाठी जागा होती. अंकिता व सुशांत पवित्र रिश्ता मालिकेतून खूप लोकप्रिय झाले होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते भेटले आणि दोघांचे प्रेम जुळले होते. आता असं समजतंय की अंकिताने पवित्र रिश्ताच्या सीक्वलसाठी एकता कपूरसोबत बोलणे केले आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेनेएकता कपूरसोबत पवित्र रिश्ता मालिकेच्या सीक्वलबद्दल बातचीत केली आहे. हा शो सुशांतसाठी खूप स्पेशल होता.अंकिता व एकता या शोच्या सीक्वलच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली देऊ इच्छित आहेत.
पवित्र रिश्ता फंडचा हिस्सा बनून मी खूश आहे आणि पुढेही अशाच प्रकारच्या उपक्रमात सामील राहून खूश राहेन.