कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत. मात्र ते सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि त्यांच्या पोस्टमुळे चर्चेतही येत आहेत. तसेच सेलिब्रेटी कपल अनुष्का शर्मा व विराट कोहलीदेखील कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात विराट अनुष्काबद्दल अनेक किस्से चाहत्यांशी शेअर केले आहेत ज्यामुळे तो सतत चर्चेत येत असतो. आताही त्याने अनुष्का आणि त्याच्या मागील वर्षातील भूतान ट्रीपमधील एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने नुकतेच फुटबॉलपटू सुनील छेत्रीसोबत एका लाइव्ह सेशनमध्ये भाग घेतला होता. यावेळी त्याने अनुष्काशी संबंधीत हा किस्सा शेअर केला. तो म्हणाला की, हे सर्व जेव्हा घडले तेव्हा अनुष्काने त्याच्याशी बोलणेच बंद केले होते. या लाइव्ह चॅटमध्ये सुनील छेत्रीने विराटला विचारले, तुमच्या भूटान ट्रीपच्या वेळी असे काय झाले होते ज्यामुळे तू अनुष्काला अर्ध्या रस्त्यातच सोडून पळून गेला होतास.