ग्लॅमर गर्ल आणि गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या चित्रा वाघ यांच्या निशान्यावर असलेली उर्फी जावेदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी नेहमीच्या अंदाजात नाही तर अंगभर झाकलेले कपडे, विस्कटलेले केस, डार्क सर्कल आणि डोळा काहीसा सुजलेला अशा अवस्थेत दिसत आहे. महत्वाचे म्हणजे पापाराझींपासून उर्फी चेहऱ्यावरील डोळ्याजवळच्या खुणा लपविताना दिसत आहे.
उर्फी नो मेकअप लुकमध्ये होती. ती बाहेर येताच चेहरा लपवत होती. उर्फीचा मंगळवारी रात्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेट नाईट डिनरसाठी ती पोहोचली होती. तेव्हाच पापाराझींनी तिला घेरले. मोठ्या अंगाचा हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि शॉर्टमध्ये उर्फी दिसत होती. तिचे केस विस्कळीत झालेले होते. पापाराझींपासून ती तिचा चेहरा लपवत होती. चेहरा लपविण्यासाठीच ती केसांचा वापर करत होती. हातांनी सुजलेला डोळा लपविण्याचा प्रयत्न करत होती.
उर्फीने मास्क घातला होता, तिला या अवतारात पाहणे कोणालाही शॉकिंगच असणार आहे. पापाराझी तिचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात एक फोटोग्राफर पडला देखील. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर देखील उर्फीचा पापाराझींनी पाठलाग केला.
उर्फीचे जे फोटो आले आहेत, त्यात तिच्या एका डोळ्याच्या खाली कसल्यातरी खुणा आहेत. डोळ्यांभोवती डार्क सर्कल आणि एक डोळा सुजलेलाही दिसत आहे. यावर युजर्सनी उर्फीला पूर्ण आणि कॅज्युअल कपड्यांमध्ये पाहून आनंद व्यक्त केला आहे. उर्फीचा हा व्हिडिओ पाहून लोक मजेशीर कमेंट करत आहेत.
चित्रा वाघ हात धुवून मागे लागल्यात...भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला. याला आता उर्फीने देखील उत्तर दिलं होतं. आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मुद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?, असं उर्फीने चित्रा वाघ यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. यावर मी स्वतः पोलिसांत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आज ट्वीट केलंय तिने, पण उद्या मला जर कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.