Join us

रामानंद सागर यांचं खरं नाव काय? ९९ टक्के लोकांना नसेल माहित, ३५ वर्षांनी लहान आहे सावत्र भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 2:42 PM

Ramanand Sagar: रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर हे हयात नसले तरी त्यांच्या नावाची चर्चा आजही होत असते. रामानंद सागर यांनी जीवनात खूप संघर्ष केला होता. या प्रवासामध्ये त्यांना आपलं नावही बदलावं लागलं होतं.

दूरदर्शनवरील रामायण ही लोकप्रिय मालिका भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासातील एक इतिहास ठरली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचं नावही या मालिकेमुळे अजरामर झालं आहे. रामानंद सागर हे हयात नसले तरी त्यांच्या नावाची चर्चा आजही होत असते. रामानंद सागर यांनी जीवनात खूप संघर्ष केला होता. या प्रवासामध्ये त्यांना आपलं नावही बदलावं लागलं होतं.

रामानंद सागर हे प्रतिभासंपन्न व्यक्ती होते. ते एक लेखक, पत्रकार, पटकथाकार, संवाद लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते. २९ डिसेंबर १९१७ रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव चंद्रमौली चोप्रा होतं. रामानंद सागर यांना त्यांच्या आजीनं दत्तक घेतलं होतं. तिनेच त्यांचं चंद्रमौली चोप्रा नाव बदलून रामानंद सागर केलं.

रामानंद सागर हे रामायण या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यांच्या जीवनातील आणखी एक गोष्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्यांचं विधू विनोद चोप्रा यांच्याशी असलेलं नातं. रामानंद सागर आणि विधू विनोद चोप्रा हे एकमेकांचे सावत्र भाऊ आहेत. या दोघांच्याही वयामध्ये तब्बल ३५ वर्षांचं अंतर आहे, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. 

रामानंद सागर यांचे वडील डीएन चोप्रा यांनी दोन विवाह केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं अपत्य रामानंद सागर हे होते. आईच्या मृत्युनंतर रामानंद सागर यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. तिनेच त्यांना नवं नाव दिलं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर रामानंद सागर यांचे वडील डीएन चोप्रा यांनी शांती देवी चोप्रा यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर विधु विनोद चोप्रा यांचा जन्म झाला. सावत्र भाऊ असले तरी रामानंद सागर हे विधु विनोद चोप्रा यांच्यावर खूप प्रेमकरायचे. तसेच दोन्ही भावांमधील संबंधही खूप चांगले होते.  

टॅग्स :रामायणटेलिव्हिजन