Join us  

रातोरात व्हायरल झालेल्या अल्लु अर्जुनच्या "Butta Bomma" गाण्याचा नेमका अर्थ काय?

By अमित इंगोले | Published: September 29, 2020 4:27 PM

अल्लू अर्जुनच्या फॅन्सच्या ओठांवर या गाण्याचे बोल “Butta Bomma” रूळत आहेत. अनेकांना हे गाणं आवडलं असलं तरी या गाण्यतील “Butta Bomma” या शब्दांचा अर्थ काय होतो?

तेलुगू सुपरस्टारर अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या “Ala Vaikunthapurramloo” या सिनेमातील “Butta Bomma” या गाण्याने सध्या धमाल उडवली आहे. हे गाणं रातोरात सुपरहिट झालं आणि सोशल मीडियावर व्हायरल झालं. अल्लु अर्जुनच्या फॅन्सच्या ओठांवर या गाण्याचे बोल “Butta Bomma” रूळले आहेत. अनेकांना हे गाणं आवडलं असलं तरी या गाण्यतील “Butta Bomma” या शब्दांचा अर्थ काय होतो? असा प्रश्न काही लोकांना पडलाय.

अल्लु अर्जुन आणि पूजा हेगडेवर चित्रित झालेल्या आणि अरमान मलिकने गायलेल्या “Butta Bomma” गाण्याला आतापर्यंत २०० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून या गाण्याची लोकप्रियता तुम्ही जाणून घेऊ शकता. अशात  “Butta Bomma” चा नेमका अर्थ काय याचा आम्ही शोध घेतला.

butta चा अर्थ होतो बास्केट आणि bomma चा अर्थ होतो बाहुली. तसेच या दोन्ही शब्दांचा अर्थ ढोबळ मानाने सुंदर बाहुली असा लावला जातो किंवा बास्केट डॉल असंही म्हणतात. सामान्यपणे जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम होतात तेव्हा बांबूपासून तयार केलेल्या मोठ्या बाहुल्या तिथे लावल्या जातात. या बाहुल्यांचा डोक्याकडचा भाग निमुळता आणि खालचा भाग पसरलेला असतो.

या आकर्षक बाहुल्या खासकरून गवत, बांबू आणि गायीच्या शेणापासून तयार केल्या जातात. नंतर त्यांना सुंदर रंग दिला जातो. “Butta Bomma” हा तेलुगू शब्द असून साऊथमध्ये बराच प्रचलित आहे. या गाण्यातही पूजा हेगडेने बोलक्या बाहुल्या करतात तसा डान्सही केला आहे. 

(Image Credit : quora.com)

त्यासोबतच “Buttabommalu” हा डान्सचा प्रकार असून हा डान्स आंध्रप्रदेशात फेस्टिव्हल सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हा एक लोकनृत्याचा प्रकार आहे. तर असा आहे  “Buttabommalu” चा नेमका अर्थ. ज्याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता. 

टॅग्स :अल्लू अर्जुनपूजा हेगडेTollywood