Join us

‘ग्लॅमर’साठी काय पण...!

By admin | Published: June 04, 2017 3:41 AM

पैसा, ग्लॅमर, नाव, झगमगाट म्हणजे चंदेरी दुनिया. पडद्यावर आपण ज्या कलाकारांना पाहतो ते मोठ्या मेहनतीने, जिद्दीने ती ‘उंची’ गाठत असतात. अर्थात कुठल्याही यशाच्या

- Aboli Kulkarniपैसा, ग्लॅमर, नाव, झगमगाट म्हणजे चंदेरी दुनिया. पडद्यावर आपण ज्या कलाकारांना पाहतो ते मोठ्या मेहनतीने, जिद्दीने ती ‘उंची’ गाठत असतात. अर्थात कुठल्याही यशाच्या मागे त्याग, समर्पण असल्याशिवाय आपल्याला ते साध्य करता येत नाही. त्यांची ही धडपड, जिद्द असते केवळ नाव, पैसा कमावण्यासाठीच. चाहत्यांच्या ओठी सदैव आपलं नाव असावं असं त्यांना वाटत असतं. पण, तुम्हाला माहितीये का? ‘बी टाऊन’ मध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी ‘याच’ ग्लॅमरसाठी स्वत:च्या आडनावाचाही त्याग केला. मग त्यामागे कारण कोणतेही असो...पाहूयात, कोण आहेत हे स्टार्स ज्यांनी त्यांच्या ‘बॉलिवूड इमेज’ साठी त्यांचे आडनाव लावणे सोडले...‘देओल’- धर्मेंद्र ‘पंजाबचा जट’ म्हणून धर्मेंद्रकडे पाहिले जाते. ८०च्या दशकांतील त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. मात्र, त्यांना बॉलिवूडमध्ये केवळ धर्मेंद्र एवढ्याच नावाने पसंत केले जाऊ लागले. पुढे त्यांची मुले सनी आणि बॉबी तसेच मुली ईशा आणि अहाना यांनी देखील देओल हे नाव लावले. मात्र, धर्मेंद्र यांना आजही आपण त्यांच्या पहिल्या नावानेच ओळखतो.‘मुखर्जी’ - काजोल‘बॉलिवूडची सेनोरिटा’ म्हणजे काजोल. तिच्या मुखर्जी कुटुंबीयांमध्ये आई तनुजा आणि त्यांच्या मुली काजोल, तनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. तिच्या आई-वडिलांमध्ये जेव्हापासून वाद सुरू झाले तेव्हापासून काजोलने तिच्या नावापुढे आडनाव लावणे बंद केले. ‘भानुरेखा गणेशन’ - रेखारेखा या ज्येष्ठ अभिनेत्री असूनही अजून त्या विविध चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. त्यांचा अभिनय, सौंदर्य सध्याच्या अभिनेत्रींना लाजवेल असेच वाटते. त्यांचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ असे होते. तमिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगू अभिनेत्री पुष्पावल्ली या त्यांच्या आई-वडिलांनी हे तिचे नाव ठेवले होते. मात्र, रेखा यांना एक हॉट नाव त्यांच्यासाठी हवे होते. म्हणून त्यांनी मग स्वत:ची रेखा म्हणून ओळख निर्माण केली.