ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांकडूनही घटस्फोटाच्या बातमीवर अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये हे नाते तुटेपर्यंत इतके टोकाला का गेले ? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
अरबाजचे वडील सलीम खान यांना या घटस्फोटाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, मी एक लेखक आहे. मला कोणाच्या प्रेम प्रकरण आणि ब्रेक अपबद्दल विचारु नका. मी माझ्या मुलांच्या आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे मला या विषयावर बोलायचे नाही असे सलीम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
मलायकची आई जॉयसी पॉलीकार्प यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार मलायका आणि अरबाजमधले मतभेद दूर करण्यासाठी उपनगरातील एका हॉटेलमध्ये मलायकाचे आई-वडील आणि बहिण अमृता दोघांना भेटले होते.
पण त्यातून काहीही सकारात्मक घडले नाही. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर दोघे स्वतंत्र गाडीमधून निघून गेले होते. अरबाजचा भाऊ सलमानने देखील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण मलायका विवाहाला दुसरी संधी न देण्याच्या विचारात आहे.