Join us

हॉलीवूडच्या ‘सक्सेस’मागे आवाज कुणाचा?

By admin | Updated: August 22, 2016 02:29 IST

अरबो डॉलर खर्च करून हॉलीवूडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, लोकेशन आणि स्पेशल इफेक्टच्या जोरावर चित्रपट बनविले जातात;

कोटी नव्हे, तर अरबो डॉलर खर्च करून हॉलीवूडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, लोकेशन आणि स्पेशल इफेक्टच्या जोरावर चित्रपट बनविले जातात; मात्र या सर्व बाबींची भारतात जादू चालेलच याची अजिबात शाश्वती दिली जात नाही. केवळ आवाजाच्या जोरावर हे चित्रपट बॉक्स आॅफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविण्यात यशस्वी होतात. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपूर्वी रीलीज झालेल्या ‘द जंगल बुक’, ‘कॅप्टन आॅफ अमेरिका’, ‘डेडपूल’ यांसारख्या चित्रपटांमधून आलीच आहे. त्यामुळेच हॉलीवूडपट निर्माते आपल्या चित्रपटाच्या डबिंगसाठी पारंपरिक आर्टिस्टचा आधार न घेता, बॉलीवूड स्टार्सच्या आवाजाला पसंती देत आहेत. कारण, या स्टार्सचा आवाज भारतीय प्रेक्षकांच्या मनात घट्ट बसलेला आहे. सध्या अशाच बहुचर्चित ‘ट्रिपल एक्स : द रीटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या विन डिजेलच्या पात्राला बॉलीवूड अभिनेता शरद केळकर याने आवाज दिल्याने पुन्हा एकदा आवाजाच्या जादूची चर्चा रंगली आहे. या अगोदरदेखील शरदने बऱ्याचशा हॉलीवूड चित्रपटांना त्याचा आवाज दिलेला आहे. या चित्रपटातून बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोन हॉलीवूडमध्ये डेब्यू करीत असल्याने भारतीय प्रेक्षकांना चित्रपटाविषयी उत्सुकता लागली नसेल, तरच नवल!