Kajol-Rani Mukerji: बॉलिवूडमध्ये अनेक भावा बहिणीच्या जोड्या पाहायला मिळतात. काजोल व राणी मुखर्जी या दोघींतही जवळचं नातं आहे. होय, दोघी चुलत बहिणी. नुकताच काजोलने राणीसोबतचा एक फोटो शेअर केलाये. सोबत राणीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या सिनेमाचं प्रमोशनही केलंय. मस्ट सी, असं तिने लिहिलं आहे. आताश: काजोल व राणी दोघींत घट्ट बॉन्डिंग दिसतं. पण काही वर्षांआधी असं नव्हतं. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण या दोघी चुलत बहिणींना एकमेकींचं तोंड पाहणंही पसंत नसे. इतकंच नाही तर काजोलने म्हणे, आपल्या एका सिनेमातून राणीला काढून टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता.
तुम्हाला ठाऊक आहेच की, राणी मुखर्जी सिनेमात आली, तोपर्यंत काजोल बॉलिवूडची मोठी स्टार बनली होती. काजोलचे वडील शोमू मुखर्जी आणि राणीचे वडील राम मुखर्जी चुलत भाऊ होते. काजोल व राणी दोघी चुलत बहिणीही जवळपास एकाच वयाच्या. काजोल इंडस्ट्रीत आली, स्टार बनली. त्यामानाने राणीचा बॉलिवूड डेब्यू जरा उशीराच झाला. पण असं म्हणतात की, राणीने इंडस्ट्रीत यायचा निर्णय घेतला तेव्हा, काजोल फार आनंदी नव्हती. काजोल मोठी स्टार असल्याने ती राणीला इंडस्ट्रीत स्थिर होण्यासाठी मदत करेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात काजोलनेच राणीच्या मार्गात अडथळे आणले होते. चर्चा खरी मानाल तर यामागे दोन्ही कुटुंबातील संपत्तीचा वाद कारणीभूत होता.
काजोल व राणीच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होता. त्यामुळे काजोल व राणी यांच्यातलं नातं फार काही मधूर नव्हतं. पुढे राणी बॉलिवूडमध्ये आली आणि बघता बघता यशराज फिल्म्सची आवडती अभिनेत्री बनली, हे पाहून काजोलचा जळफळाट व्हायचा. राणीआधी काजोल यश चोप्रांची आवडती अभिनेत्री होती. पण आता ती जागा राणी घेऊ पाहत होती. यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा यशराज फिल्म्सचा कर्ताधर्ता बनल्यानंतर राणी यशराजची नवीन आवडती अभिनेत्री बनली. साहजिकच काजोल राणीचा आणखी द्वेष करू लागली होती. पुढे करण जोहरने राणीला काजोल आणि शाहरुखच्या सोबत त्याच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात कास्ट केलं, तेव्हा काजोल चांगलीच बिथरली होती. रिपोर्टनुसार, 'कुछ कुछ होता है'मध्ये राणीच्या जागी दुसरी अभिनेत्री घ्यावी यासाठी तिने म्हणे करणवर दबाव आणला होता.
पण राणी ही आदित्यची पसंत होती. त्यानेच करण जोहरला राणी मुखर्जीला कास्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच करण 'कुछ कुछ होता है'मध्ये राणीला घेण्यास नकार देऊ शकला नाही. काजोल मनातून संतापली होती, मात्र तरीही तिने राणी मुखर्जीसोबत काम केलं. दोघींनी एकत्र काम केलेला हा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता.
राणी मुखर्जीने कालांतराने इटलीत आदित्य चोप्रासोबत गुपचूप लग्न केलं. आज ती यशराज फिल्म्सची मालकीण आहे. आता इतक्या वर्षानंतर काजोल व राणीमधलं नातंही बदललं आहे. वयासोबत आलेली प्रगल्भता म्हणा वा आणखी काहीही पण आताश: राणी व काजोल यांच्यात सर्वकाही ठीक आहे. काजोल राणीच्या सिनेमाचं प्रमोशन करतेय म्हटल्यावर, तुम्ही समजू शकताच...