Join us

शबाना आझमी करायच्या स्मिता पाटीलचा तिरस्कार; महेश भट्टमुळे दोघींमध्ये पडली वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:36 IST

Smita patil: शबाना आणि स्मिता यांच्या कुटुंबातील लोकांमध्ये चांगलं मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, तरीदेखील या दोन अभिनेत्री एकमेकींचं तोंड पाहात नव्हत्या.

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मैत्रीचे जितके किस्से रंगतात तितकेच त्यांच्यातील वादविवादाचीही चर्चा होते.  सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींच्या वादाची चर्चा रंगली आहे. एकेकाळी अभिनेत्री स्मिता पाटील (smita patil) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्यात मोठा गैरसमज निर्माण झाला होता. ज्यामुळे कित्येक वर्ष या अभिनेत्री एकमेकींचं तोंडही पाहात नव्हत्या.

स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मात्र, एवढ्या कमी काळातही त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं. याच काळात त्यांनी अनेक आठवणी चाहत्यांना दिल्या. त्यातलाच एक किस्सा म्हणजे शबाना आझमीसोबत असलेलं त्यांचं वैर.

१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अर्थ' या सिनेमामध्ये दोन्ही दिग्गज अभिनेत्रींनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मात्र, याच सिनेमामुळे त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. या वादामागे महेश भट्ट जबाबदार असल्याचं सांगण्यात येतं. अर्थ या सिनेमामधून स्मिता पाटील यांचे अनेक सीन कट करण्यात आले होते. त्यामुळे महेश भट्ट आणि शबाना आझमी यांच्यात चांगली मैत्री असल्यामुळे शबानाच्या ऐवजी मुद्दाम आपले सीन कट केलेत असा समज स्मिता पाटील यांचा झाला होता. आपल्याला कमी स्क्रीन टाइम मिळावा यासाठीच या दोघांनी असं केलं असं समजून त्या नाराज झाल्या होत्या. ज्यामुळे स्मिता पाटील यांनी महेश भट्ट आणि शबाना आझमी यांच्याशी असेला संवाद पूर्ण थांबवला होता.

दरम्यान, शबाना आणि स्मिता यांच्या कुटुंबातील लोकांमध्ये चांगलं मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, तरीदेखील या दोन अभिनेत्री एकमेकींचं तोंड पाहात नव्हत्या. मात्र, स्मिता पाटीलच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यावेळी मी स्मिताच्या मनाला लागेल असं बरंच बोलले होते. मात्र, आता मला त्याचा पश्चाताप होतोय. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी असं बोलायला नको होतं. पण, मीडियाने माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करत बातम्या पसरवल्या होत्या, असं शबाना आझमी म्हणाल्या होत्या.

टॅग्स :स्मिता पाटीलशबाना आझमीबॉलिवूडसिनेमा