बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिंदी चित्रपटातच नव्हे तर हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे. ऐश्वर्या आणि हॉलिवूड स्टार विल स्मिथला नेहमीच एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा होती, पण तसे होऊ शकले नाही. विल स्मिथने ऐश्वर्याला हिच आणि सेवन पाउंड्स आणि टुनाईट ही कम्स या सिनेमांची ऑफर दिली होती. मात्र यापैकी एकाही सिनेमात ती काम करु शकली नाही कारण तिच्याकडे वेळ नव्हता.
मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.