Join us

कर्जात बुडाले होते बिग बी अमिताभ बच्चन, 'मिस वर्ल्ड शो'मुळे ओढावलं आर्थिक संकट अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 4:04 PM

बिग बींकडे आज सर्व काही आहे पण एकेकाळी त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता.

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रसिद्धीसोबतच संपत्तीही कमावली आहे. बिग बींकडे आज सर्व काही आहे पण एकेकाळी त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता. अनेक वेळा काही निर्णय तुम्हाला उंचीवर घेऊन जातात तर काही निर्णय जमिनीवर आणून ठेवतात. अमिताभ यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. बिग बींनी ABCL ही कंपनी स्थापन केली होती, ही कंपनी चित्रपट निर्मितीपासून ते वितरण आणि इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत काम करत होती. अमिताभ यांनी या कंपनीबद्दल खूप स्वप्ने पाहिली, प्रयत्नही केले पण पैज उलटली आणि संकटांचा डोंगर कोसळला.

 बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाच्या कंपनीची पायाभरणी केली होती. या कंपनीला  पुढे नेण्याचे अमिताभ यांचे स्वप्न होते, पण नशिबात काही वेगळेच होते. काही निर्णय चुकीचे ठरले आणि कंपनी तोट्यात गेली, कर्जाचा बोजा वाढला, दिवाळखोरी जाहीर झाली. बिग बींच्या या कंपनीला बुडवण्यात 5 प्रोजेक्ट्सचा हात होता. 

सिनेमा फ्लॉप झाले कंपनी तोटात गेलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी सुमारे 60 कोटी रुपये खर्चून  ABCL सुरू केली आणि पहिल्या वर्षी सुमारे 15 कोटींचा नफा झाला. त्याचबरोबर काही मोठ्या प्रोजेक्टमुळे नुकसान झालं. 2013 मध्ये मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांच्या वाईट दिवसांचा उल्लेख केला होता. अमिताभ यांच्या कंपनीने 'मृत्युदाता' हा चित्रपट बनवला. हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला. त्यानंतर 'सात रंग के सपने' हा चित्रपट बनवला, या चित्रपटाही फ्लॉप ठरला त्यामुळे ABCLचे जबरदस्त नुकसान झाले.

मिस वर्ल्ड शोमुळे बिघडलं बजेटABCL ने मिस वर्ल्ड शोचं आयोजन हातात घेतलं होतं.  हा शो अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही. बेंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या या शोने कंपनीचे बजेटही बिघडवले. आर्थिक संकटामुळे कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि शोमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पगारही देऊ शकली नाही, असे म्हटले जाते. याशिवाय 'एबी बेबी, द म्युझिक अल्बम' रिलीज झाला. काळाचा प्रभाव इतका होता की हा अल्बमही खर्चाच्या तुलनेत कमाई करू शकला नाही.

सलग 4 प्रोजेक्ट अयशस्वी झाल्यानंतर कंपनीने 'नाम क्या है' चित्रपटात पैसे गुंतवले. या चित्रपटात मुकुल देव मुख्य कलाकार होते, हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही, कंपनी दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आलं. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटी