चित्रपटसृष्टीच्या चमचमत्या नभांगणातील चांदणी आणि सौंदर्याचे लेणं लाभलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. याच अभिनयाच्या जोरावर श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीत मल्लिका-ए-हुस्न किंवा बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार म्हणून संबोधलं जातं. हा तो काळ होता ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत फक्त आणि फक्त अभिनेत्यांचाच बोलबाला होता.
श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळे स्थान निर्माण केले. रसिक श्रीदेवी यांच्यावर जीव ओवाळून टाकू लागले. श्रीदेवी नावाचं अदभुत रसायन हिंदी चित्रपटसृष्टीत जादू करु लागलं. त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलंच, शिवाय त्यांच्यानंतर येणा-या अनेक नायिकांसाठी त्यांनी बॉलीवुडमध्ये स्वतःचे नाव कमावण्याची संधी उपलब्ध करुन दिली.
हिंदीत जो काही महिलाप्रधान सिनेमांचा ट्रेंड पाहायला मिळतो त्याचे सगळे श्रेय श्रीदेवी यांनाच जातं. पुरुष सहकलाकारांपेक्षा त्या कोणत्याही बाबतीत मागे नव्हत्या.
श्रीदेवी आणि पती बोनी कपूर यांच्यातील प्रेमाचे नातं अनेकदा पाहायला मिळाले. आपले सिनेमा आणि आपल्या भूमिका यामुळे कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या श्रीदेवी मृत्यू पश्चातही तितक्याच चर्चेत आहेत. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यातील अशाच मिळत्याजुळत्या हळुवार क्षणाची आठवण करुन देणार आहोत.
1970च्या दशकात श्रीदेवी तामिळ सिनेमांत काम करत होत्या, तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते. मात्र श्रीदेवीच्या प्रेमात पडण्याआधी बोनी कपूर मोना शौरी 19 वर्षांच्या असताना त्यांचे त्यांच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठ्या असलेल्या बोनी कपूर यांच्यासोबत लग्न झाले होते. दोघांचे अरेंज मॅरेज होते. दोघेही या लग्नाने आनंदी होती.
मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुलाच्या जन्मापर्यंत सर्वकाही नीट सुरु होते. मात्र दोघांच्या सुखी वैवाहिक आयुष्यात अचानक श्रीदेवीची एन्ट्री झाली आणि बोनी कपूर पहिली पत्नी मोनापासून कायदेशीररित्या विभक्त झाले.
मोनासह त्यांचे लग्न जवळपास १३ वर्ष टिकले होते. श्रीदेवीच्या प्रेमात बोनी कपूर इतके बुडाले होते की त्यांनी पहिल्या पत्नीला श्रीदेवीशिवाय जगुच शकत नाही असे कारण देत घटस्फोट दिला होता.